Hot Posts

6/recent/ticker-posts

नाईचाकूर येथे राष्ट्रमाता जिजाऊ गणेश मित्र मंडळच्यावतीने ह .भ .प. शिवलीला ताई पाटील यांचे कीर्तन सेवा

नाईचाकूर येथे उद्या राष्ट्रमाता जिजाऊ गणेश मित्र मंडळच्यावतीने  ह .भ .प. शिवलीला ताई पाटील यांचे कीर्तन सेवा 

उमरगा : तालुक्यातील नाईचाकूर येथील राष्ट्रमाता जिजाऊ गणेश मित्र मंडळा तर्फे वा. बुधवार दि. 18 रोजी समाज प्रबोधनकार ह. भ .प. शिवलीला ताई पाटील यांचे कीर्तन जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर संध्याकाळी ठीक आठ वाजता किर्तनाचे आयोजन केले आहे .

गणेश उत्सवात होणारा खर्च लाइटिंग, डॉल्बी ,भव्यमंडप, सजावट, भव्य मिरवणूकीत होणारा खर्च टाळून  राष्ट्रमाता जिजाऊ गणेश मित्र मंडळाने गणेशाचे नव्या दिवशी विसर्जन करण्याचे एकमताने ठरले आहे  गणेशाची विसर्जन 11 व्या दिवशी करण्यात येते पण पोलीस प्रशासनावर होणारा अतिरिक भार यांचा विचार करून मंडळांनी भव्य मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने श्री चे विसर्जन करण्याचे आयोजन केले आहे.

 तो खर्च टाळून समाजाला त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी एकमताने  प्रबोधनकार शिवलीला ताई पाटील यांचे कीर्तन आयोजित केले आहे महिलावर होणाऱ्या अत्याचार ,व्यसनमुक्ती , मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम किर्तन रुपी समाज प्रबोधन करण्याची विनंती मंडळांनी केली आहे राष्ट्रमाता जिजाऊ गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष अनुराग पवार, उपाध्यक्ष वैभव पवार, आदर्श पवार विश्वजीत पवार इतर सदस्यांनी या  कीर्तन सेवेचा पंचक्रोशीतील भाविकभक्तांनी लाभ घ्यावे मंडळाने आव्हान केले आहे.

Post a Comment

0 Comments