तुळजापूर : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आर एस गायकवाड यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवारत्न सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी तुळजापूर शहर अध्यक्ष धम्मशिल कदम आणि त्यांच्या टीमच्या वतीने आर एस गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नवनाथ पांडागळे, राकेश कदम, अमोल कांबळे,मनोज सिरसठ यांच्या वतीने आर एस गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच रिपब्लिकन पक्षाचे नेते दाजीबा कदम आणि रिपब्लिकन कामगार आघाडीचे राज्य उपाध्यक्ष संजय ( नाना) शितोळे यांच्या वतीने आर एस गायकवाड यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर सेवा रत्न सम्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.उपस्थित मान्यवरांनी आर एस गायकवाड यांच्या कार्याचा गौरव करुन अभिनंदन केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी संजय नाना शितोळे बोलताना म्हणाले की ,आम्ही आर एस गायकवाड यांच्या सामाजिक कार्याचा साक्षीदार आहे.त्याचे काम खुप मोठं आहे.सोलापुर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते कार्यकर्ते पत्रकार प्रा.याना ओळखतात आमचे चांगले संबंध आहेत आणि यापुढेही असेच कायम राहवे यासाठी आर एस साहेब यांना उदंड आयुष्य लाभो चांगले आरोग्य लाभो हीच प्रार्थना अशा शुभेच्छा दिल्या तर वंचीत बहुजन आघाडीचे तुळजापूर शहर अध्यक्ष धम्मशिल कदम यांनी आभार मानले
0 Comments