Hot Posts

6/recent/ticker-posts

हैदराबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील बाभळगाव तलावाजवळ बस पलटी , अनेक प्रवासी जखमी

हैदराबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील बाभळगाव तलावाजवळ बस पलटी , अनेक प्रवासी जखमी 


तुळजापूर : हैदराबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरील बाभळगाव केरुर पुलावरील तलावाजवळ राज्य परिवहन महामंडळाचे सांगोला- हैदराबाद(MH-13-U-7951) या बसचा अपघात झाला. हा अपघात मंगळवारी दि.२४ रोजी  दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात जवळपास 30 ते 40 प्रवासी प्रवास करत होते यातील अनेक प्रवासी जखमी झाली आहेत. जखमी प्रवाशांना अनुदुर येथील प्राथमिक रुग्णालयात तसेच नळदृग येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यात कोणतेही जीवित हानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात प्रवासी जखमी झाले आहेत. तलावावरील पुलाला कठडे नसल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे .या अपघाताची माहिती  मिळताच ईटकळ आऊट पोस्ट पोलीस ठाण्याचे कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली.

Post a Comment

0 Comments