तुळजापूर : राज्यातील राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसची तांत्रिक ऑडिट करण्यात यावे या मागणीसाठी आम आदमी पार्टी धाराशिव वतीने श्री .मधुकर शेळके जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते यांनी मा . मुख्यमंत्री मोहदयांना तहसिलदार तुळजापूर मार्फत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की राज्य महामार्ग परिवहन महामंडळ (एस .टी ) अंतर्गत चालणाऱ्या सर्व बसेस चे अनुभवी तज्ञा मार्फत तांत्रीक ऑडीट करावे व नांदुरस्त मोडकळीस आलेल्या बसेस मधुन प्रवासी वाहतुक करू नये व नवीन बसेस उपलब्ध करून दयाव्यात अशी मागणी केली आहे .
राज्यात संध्या मोठ्या प्रमाणात एस टी बसेस चे ब्रेक फेल होने रस्त्यातच बसेस तांत्रीक बिघाड येऊन बंद पडणे अश्या घटना मोठया प्रमाणात होत आहेत त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अपघात झाले आहेत .
सर्वसामन्य मध्यमवर्गीय गरीब कुटुंबाचे प्रवासाचे सोयिस्कर सुरक्षित साधन हे एस टी बस आहे . यामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यातील नागरीक , जेष्ट नागरिक , महिला तसेच शालेय विद्यार्थी , चाकरमाने मोठ्या प्रमाणात दैनंदीन प्रवास करतात मात्र मागेल काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात नादुरस्त तांत्रीक बिघाडामुळे बसेस प्रवासातच बंद पडने , इंजीन खराब होने ब्रेक होले अश्या घटना मोठया प्रमाणात घडत आहेत त्यामुळे अपघात होत आहेत .बसेस मधुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेउन प्रवास करावा लागत आहे.सर्वसामान्य मध्यवर्गीयाचे प्रवासाचे विश्वसनीय सुरक्षित साधन एसटी बसेस आहे . सनासुदीच्या कालावधीत सुट्या मध्ये एसटी बसेसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शासनाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होते .
मा .मुख्यमंत्री मोहदय आपल्या माध्यमातून संबंधीत यंत्रणेला सुचना देऊन राज्यतील सर्व एस .टी बसेसचे अनुभवी तज्ञा मार्फत तांत्रीक तपासणी ऑडीट करून नादुरस्त मोडकळीस आलेल्या बसेस मधुन प्रवासी वाहतुक करणे थांबवावे व नवीन बसेस राज्य महामंडळाला उपलब्ध करून दयाव्यात सदरील बाबतचे निवेदन आम आदमी पार्टी धाराशिवच्या माध्यामातून
श्री .मधुकर शेळके जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक व आप चे शहर अध्यक्ष श्री किरण माणिक यादव आणि श्री स्पनिल शितोळे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सादर केले आहे .
तरी सदरील निवेदनाची त्वरीत दखल घेतली जाईल व राज्यातील जनतेचा " सुरक्षित व आनंदायी प्रवास " लवकर होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे . निवेदनाची प्रत माहितीस्तव मा .अप्पर मुख्य सचीव साहेब व मा . विरोधी पक्षनेते यांना पाठवण्यात आली आहे.
0 Comments