Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्याच्या सरपंच उपसरपंचाच्या मानधनात दुप्पट वाढ, राज्य मंत्रिमंडळात निर्णय

राज्याच्या सरपंच उपसरपंचाच्या मानधनात दुप्पट वाढ,  राज्य मंत्रिमंडळात निर्णय


मुंबई: राज्यातील सरपंच व उपसरपंचाच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला सरपंचांना आता ग्रामपंचायतच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार दरमहा 6000 हजार ,8000 हजार, आणि दहा हजार रुपये असे मानधन मिळणार आहे उपसरपंचांना दरमहा 2 हजार, 3 हजार आणि चार हजार रुपये मानधन मिळेल.

सरपंचांना सध्या 3 हजार 4 हजार आणि 5 हजार रुपये तर उपसरपंचांना 1000 ,1500 आणि 2000 हजार रुपये दरमाह इतके मानधन मिळते. राज्यात 27 हजार 983 ग्रामपंचायती आहेत सरपंच उपसरपंचाचे मानधन वाढवण्यासोबतच राज्यातील ग्रामसेवकांनी ग्रामविकास अधिकारी पदाचे एकत्रीकरण करून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ग्रामसेवक S (8) व ग्रामविकास अधिकारी एस(12 ) ही दोन्ही पदे एकत्रित करून त्यांना 25 हजार 581- 81 हजार  100 या वेतनश्रेणीतील ग्रामसेवक हे मूळपद कायम ठेवून पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी असे करण्याचे निर्णय घेण्यात आला नव्या ग्रामपंचायत अधिकारी पदास दहा वर्षानंतरच्या सेवेचा पहिला लाभ विस्तार अधिकारी (एस 14) वीस वर्षाच्या सेवेनंतरचा दुसरा लाभ सहाय्यक गटविकास अधिकारी (एस-15) 30 वर्षानंतरच्या सेवेचा तिसरा लाभ गट विकास अधिकारी असा मिळेल.


Post a Comment

0 Comments