पोतराज महासंघ महाराष्ट्र राज्य तुळजापूर तालुका अध्यक्ष पदी आप्पासाहेब नामदेव साखरे यांची निवड
तुळजापूर : पोतराज महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेची तालुका स्तरीय निवड करण्यासाठी महासंघाचे कार्याध्यक्ष मा.लखन आण्णा ननवरे यांनी मौजे माळशिरस शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठक बोलवण्यात आली यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून जिल्हा कार्यकारणी व समस्त पोतराज बांधव बैठकीस उपस्थित झाले होतो या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा. लखन आण्णा ननवरे होते.
या बैठकी वेळी समस्त पोतराज बांधवांचे समजाविषयी असणारी भावना वा त्यांच्या प्रदीर्घ कार्याची दाखल घेऊन जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी नावे सुचवून त्यातून निवडक पोतराजांची तालुका अध्यक्ष/ उपाध्यक्ष/ व कार्याध्यक्ष म्हणून खालील प्रमाणे निवड करण्यात आली आहे.तुळजापूर तालुका अध्यक्ष :- मा. आप्पासाहेब नामदेव साखरे, उपाध्यक्ष :- मारुती कृष्णात भोवळ, कार्यध्यक्ष :- सचिन पोपट माने लोहारा तालुका अध्यक्ष :- दुर्गा तुकाराम माने उपाध्यक्ष लहू लिंबराज कांबळे ,उमरगा तालुका अध्यक्ष कृष्णात शिवाजी भोवळ, उपाध्यक्ष लक्ष्मण दाजी गायकवाड, कार्याध्यक्ष अनिल अर्जुन जाधव, लखन आण्णा ननवरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे, या कार्यक्रमाच्या वेळी धाराशिव जिल्हा अध्यक्ष मा. नागनाथ शिवराम शिंदे तर धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष मा. धनराज लक्ष्मण सरवदे आदी पोतराज बांधव उपस्थित होते.
0 Comments