कृषी न्यूज :ई पिक पाहणीची तारीख वाढली, या तारखेपर्यंत मुदतवाढ
मुंबई , पिक पाहणीची तारीख वाढली, या तारखेपर्यंत मुदतवाढ (E Pik Pahni)
मुंबई :पीक विमा, नुकसान भरपाई आणि विविध कृषी योजनांचा लाभ घेन्यासाठी ई पिक पाहनी करने आवश्यक आहे. त्यामुळे खरीप हंगाम 2024 मध्ये तांत्रिक आडचनीमुळे ई-पीक पाहणी करू न शकलेल्या शेतकऱ्यांसाठी मुदतवाढीचा निर्णय घेन्यात आला आहे. ई-पीक पाहणीसाठी सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
ई-पीक पाहणीची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024 वरून 23 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आता 23 सप्टेंबरपर्यंत ई-पीक पाहणी करू शकतील.
शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती आणि तांत्रिक अडचणींमुळे ई-पीक पाहणी करण्यात अडचणी येत आसल्यामुळे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मुदतवाढीची मागणी केली होती, ती लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणीची 23 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे . शेतकऱ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन आपली ई पीक पाहणी वेळेत पूर्ण करावी.ई पिक पाहनी न केल्यास शासकीय अनुदान, पिकविमा आणि ईतर शासकीय योजनांचा लाभ घेन्यात आडचनी येउ शकतात. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणी लवकरात लवकर करावी असे कृषी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
0 Comments