Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील 51 उमेदवाराचे 77 अर्ज मंजूर, ४ तारखेनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार


तुळजापूर : तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील दाखल उमेदवाराच्या अर्जाची छाननी दिनांक 30 बुधवार रोजी झाली. यामध्ये दाखल असलेल्या 54 उमेदवाराच्या 87 अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. छाननी प्रक्रियेत तीन उमेदवाराचे दहा अर्ज विविध कारणास्तव  बाद करण्यात आली असून 51 उमेदवाराचे 77 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

उमेदवारी अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर आहे. त्यानंतरच लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. तुळजापूर विधानसभा निवडणुकीत निवडणूक दुरंगी होईल असे वाटत असताना सद्यस्थिती पाहता निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निवडणुकीमध्ये प्रमुख राजकीय पक्षासह अनेक आजी माझी लोकप्रतिनिधी दिग्गज नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या अथवा अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सुरुवातीला तुळजापूर विधानसभा निवडणूक दुरंगी वाटत असली असताना आता बहुरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा निवडणुकीच्या आखाड्यात बंडखोर उमेदवारांची संख्या वाढली असल्याने निवडणुकीमध्ये चुरस  वाढली आहे.

या विधानसभा निवडणुकीत बंडखोरीचे ग्रहण लागले असल्याने नेत्यांची कसोटी लागली आहे. या बंडखोर उमेदवाराची मनधरणी कशी करायची ? त्यांची पुनर्वसन कसे करायचे असा प्रश्न नेत्यांना सताव लागला आहे.

Post a Comment

0 Comments