जालना: भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाणे हद्दीतील भोरखेडा येथील एका २७ वर्षीय तरुणाचे दोघांनी कमिशन घेऊन लग्न जुळून दिले पण काही तासातच सदरच्या नवरीला परत माघारी पळवून घेऊन जाणाऱ्या दोघासह नकली नववधूच्या विरोधात पारध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळाली सविस्तर माहिती अशी की भोरखेडा तालुका भोकरदन येथील तरुण कैलास धोंडीबा सोनवणे वय (27) यास संशयित निलेश श्रावण मुनेश्वर राहणार (बांगर नगर बालापुर रोड यवतमाळ )व किशोर बनसोडे राहणार फरदापुर जिल्हा संभाजीनगर यांनी संगमत करून आम्ही तुझे लग्न एका मुलीसोबत लावून देतो त्या बदल्यात तु आम्हाला सव्वा दोन लाख रुपये दे असे सांगितले विवाह इच्छुक कैलास सोनवणे यासाठी तयार झाले. त्यानंतर त्यांनी रोख सव्वा दोन लाख रुपये संशय दोघांना दिले लग्न बोरखेडा येथे लावा असे सांगितले.
त्यानुसार बुधवार दिनांक 29 रोजी बोरखेडा येथील एका मंदिरात हिंदू धार्मिक पद्धतीने विवाह लावण्यात आला; मात्र गुरुवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी नवरीने माजी तब्येत ठीक नाही मला दवाखान्यात घेऊन चला अशी थाप कैलास यास मारली. तिच्या सांगणयानुसार कैलास हा दिक्षाला दवाखान्यात घेऊन जात असताना मादनी येथे गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी दीक्षा व सोबतच्या पुतणीला त्यांनी रोडवरच उतरवले व तेव्हा अगोदरच रस्त्यात लपून बसलेल्या संशयीत निलेश यांनी पत्नीला जागेवर सोडून दिले त्यानंतर नवरी व मुनेश्वर दोघेही फरार झाले तेव्हा कैलास ने भाऊ व मित्रांना फोन करून दोघांना अडवण्याची सांगितले.शिवना बस धाब्यावर कैलाश यांच्या मित्रांनी पळून जात असलेल्या निलेश मुनेश्वर व नववधू या दोघांना अडवले तेथील उपसरपंच अरुण वाघ यांनी याबाबत अजिंठा पोलिसांना कळवून दोघांनाही पोलिसांच्या स्वाधीन केले.,परंतु भोरखेडा हे पारध हद्दीत असल्याने कैलास धोंडीबा सोनवणे यांनी पारध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली .सहाय्यक निरीक्षक माने कर्मचारी प्रदीप सरडे यांनी तपास केला असता त्यांनी नकली नवरी आणि निलेश श्रवण मुनेश्वर यांना अटक केली .
बनावट नववधूची रवानगी महिला सुधारकृहात करण्यात आली आहे निलेश मुनेश्वर यास कोर्टात हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे सहाय्यक निरीक्षक माने यांनी सांगितले. फरार संशयित कैलास बनसोडे हा फरार झालेला आहे दरम्यान सध्या अशा प्रकारे लोकांना लग्न लावून देतो असे सांगणारे रॅकेट लोकांचे फसवणूक करत आहे तेव्हा नागरिकांनी अशा अनोळखी लोकांसोबत पैसे देऊन लग्नाची व्यवहार करू नये अशी आव्हान पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संतोष माने यांनी केली आहे.
0 Comments