धाराशिव : तुळजाभवानी क्रिडा संकुल, धाराशिव येथे दिनांक १० ऑक्टोबर रोजी झालेल्या शालेय विभागीय टेनिक्वॉईट स्पर्धेत श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज, धाराशिव येथील मुलींचा संघ द्वितीय ठरला. या निमित्ताने कु. प्रिया पवार, कु. गायत्री जहागिरदार, कु.सृष्टी भंडारे, कु. अनुजा ढेकळे, कु. कृष्णा वीर, कु. श्रेयसी काळे या सर्व खेळाडू मुलींचा कॉलेजचे उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर व इतर मान्यवर शिक्षकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सोबतच महाविद्यालयातील विद्यार्थी कुमार राज चंद्रजीत जाधव या विद्यार्थ्याला अखिल भारतीय स्तरावरील, देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना देण्यात येणारा २०२२-२३ चा 'भरत' पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल उपप्राचार्य श्री. घार्गे सर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच या सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करणारे क्रिडाशिक्षक प्रा. श्री. व्ही. एम. कापसे सर यांचा देखील उपप्राचार्य यांनी सत्कार केला. या सत्कार प्रसंगी कला, वाणिज्य व विज्ञान विभागाचे पर्यवेक्षक प्रा. श्री. एम. व्ही. शिंदे सर, फोटॉन बॅच प्रमुख. प्रा. श्री. ए. व्ही. भगत सर, एनईईटी रिपीटर बॅचचे प्रमुख प्रा. श्री. डी. व्ही. पुजारी सर, प्रा. श्री एम. बी. डोलारे सर, प्रा. श्री. के. बी. मोहिते सर आदींची खास उपस्थिती होती.
खेळाडूंच्या या कामगिरीबद्दल संस्थाध्यक्ष श्री. सुधीर आण्णा पाटील सर, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आदित्य पाटील सर, संस्थेच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई सुधीर पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. एस. एस. देशमुख सर, प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे सर आदींनी अभिनंदन केले.
0 Comments