Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरच्या वाहतूक मार्गात बदल, पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन



धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे दिनांक 16 व 17 रोजी मंदिर पौर्णिमेला उत्सव साजरा होणार आहे या निमित्ताने या दोन दिवसात सहा लाखापेक्षा जास्त भाविक पायी चालत श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दाखल होतात. यामध्ये सोलापूरच्या शिवलाड समाजाच्या मानाच्या काठ्यासह हजारो भाविक पायी तुळजापूर येथे दाखल होतात. या सर्व पार्श्वभूमीवर पायी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून सोमवारी दिनांक 14 रात्री बारा वाजेनंतर पासून ते दिनांक 17 ऑक्टोंबर च्या रात्री बारा वाजेपर्यंत तुळजापूर शहरात दाखल होणाऱ्या मार्गावरील वाहतूक इतर पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉ. सचिन ओंबासे व पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी काढले आहेत.

यामध्ये छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद कडे जाणाऱ्या व याच मार्गे परतणाऱ्या वाहतुकीला धाराशिव पासून तुळजापूर व पुढे नळदृगकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. लातूर ते सोलापूर कडे तुळजापूर मार्गे जाणाऱ्या वाहतुकीला पावसापासून पुढे तुळजापूर तामलवाडी मार्गे सोलापूर पर्यंत जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच परतीचाही हा मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच तुळजापूर ते बार्शी हा मार्गही सदरील कालावधीत वाहतुकीस बंद राहणार आहे वरील मनाई करण्यात आलेल्या मार्गावरील वाहने खालील प्रमाणे वळवण्यात आले आहेत.

यामध्ये छत्रपती संभाजी नगर ते हैदराबाद कडे जाणारी वाहतूक बीड -मांजरसुंबा - अंबाजोगाई- लातूर - औसा - उमरगा मार्गे पुढे हैदराबाद कडे किंवा बीड - येडशी - ढोकी -मुरुड - लातूर - औसा - उमरगा मार्गे पुढे हैदराबाद कडे रवाना होतील. तसेच हैदराबाद ते छत्रपती संभाजीनगर वाहतूक याच मार्गे परतीचा प्रवास करेल. धाराशिव ते सोलापूर या मार्गावरील वाहतूक वैराग मार्गे ये जा करेल. लातूर ते सोलापूर कडे जाणारी वाहतूक मुरुड पासून ढोकी - येडशी - बार्शी मार्गे सोलापूर या मार्गे ये जा करतील छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर कडे जाणारी वाहतूक येरमाळ्यापासून बार्शी मार्गे पुढे सोलापूरला व सोलापूर कडून याच मार्ग छत्रपती संभाजी नगरला वाहतूक वळवण्यात आली आहे. तुळजापूर ते बार्शीकडे जाणारी वाहतूक तुळजापूर धाराशिव मार्गे पुढे बार्शीला रवाना होतील. तुळजापूर ते सोलापूर ही वाहतूक मंगरूळ पाटी - ईटकळ बोरामणी - मार्गे पुढे सोलापूर व याच मार्गे पुन्हा तुळजापुरला येतील. वरील वाहतूक मार्गावरील बदल हे पोलीस रुग्ण सेवा, अग्निशामक दलाचे वाहने व अत्यावश्यवेतील वाहने व एसटी बसेस यांना लागू राहणार नाहीत. या बदलाचा कालावधी दिनांक 14 च्या मध्यरात्री ते दिनांक 17 ऑक्टोंबर च्या मध्ये रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

Post a Comment

0 Comments