धाराशिव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज 65 उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. परांडा विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटानं निष्ठावंत शिवसैनिकाच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. उद्धव ठाकरेंचे कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेल्या माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या मुलगा रणजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात ते मैदानात उतरवले आहेत.तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून राहुल मोटे हे इच्छुक होते. मात्र, महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सुटला आहे. तीन टर्म आमदार राहिलेल्या राहुल मोटेंचा पत्ता यावेळेस कट झाला आहे.
0 Comments