Hot Posts

6/recent/ticker-posts

धक्कादायक! अत्याचार करून अंगणवाडी सेविकेचा निघृण खून


अहिल्यानगर:   नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथे गुरुवारी दिनांक 24 ऑक्टोबर रोजी अंगणवाडी सेविकाचा अत्याचार करून निग्रहण खून केल्याची घटना घडली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे . तर मृतदेह जवळील नदीपत्रात फेकून देण्यात आल्याची उघडकीस आली आहे या घटनेचा तपास नगर तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 12 तासाच्या आरोपींना अटक केली.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की चिंचोडी पाटील गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील मारुती वाडी भागात ही मिनी अंगणवाडी आहे सदर सेविका रोज नोकरी निमित्ताने त्या ठिकाणी जात असे. सदर अंगणवाडी इमारत ही काहीशा निर्मनुष्य ठिकाणी असून अंगणवाडी इमारती पासून पाचशे मीटर अंतरावर वस्ती आहेत सदर महिला तिच्या नेहमीच्या वेळेस नुसार अंगणवाडीत गेली होत दरम्यान अटक केलेला इसम सुभाष खंडू बर्डे हा मोर्चा वांबोरी परिसरातील कुकुटवेढे येथील रहिवासी असून लग्नानंतर सुमारे आठ वर्षापासुन सासुरवाडी आठवड येथे राहत होता. मागील एक ते दीड वर्षापासून तो चिंचोली पाटील येथे राहत होता . पत्नी सोबत भांडण झाल्याने ती माहेरी गेली होती दरम्यान गुरुवारी अंगणवाडीतील मुलांना दिवाळीची सुट्टी लागणार होती. आरोपीची मुलगी देखील त्याच अंगणवाडीत शिकत होती पण एक महिन्यापासून ती शाळेत येत नव्हती तिचा पोषण आहार घेऊन जाण्यासाठी सदर अंगणवाडी सेविकांनी आरोपीला सकाळी अंगणवाडीत आल्यावर फोन केला यायला उशीर होत असल्याचे सांगत तुम्ही थांबा असे आरोपीने अंगणवाडी सेविक ला फोन करून सांगितले. अंगणवाडी सुमारे आकाराच्या सुमारास सुटल्याने सदर महिला अंगणवाडीत एकटीच होती आरोपींनी अंगणवाडी सेविका एकटीच आहे आणि जवळपास कोणी नाही हे पाहून अंगणवाडी सेवकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला झटापटीत त्या सेविकीचे डोके भिंतीवर आपटल्याने ती बेशुद्ध झाली आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जवळील नदीत फेकून देत पोबारा केला मात्र अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अवघ्या बारा तासाच्या आत अटक करत गुन्हा कबुली केली.

संपूर्ण गावाने आज उस्फुर्तपणे बंद पाळला तर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत कॅन्डल मार्च काढून निषेध नोंदवला.

गुन्हा फास्टट्रॅक कोर्टात चालवावा

हा गुन्हा अत्यंत चिड आणणारा आणि मानवतेला कलंक फासणारा आहे यामुळे मानवी वस्त्यापासून लांब असणाऱ्या अनेक अंगणवाडी सेविका व लहान मुलांच्या सुरक्षितता प्रश्न ऐरणीवर आला आहे मिनी अंगणवाडी मध्ये फक्त एक नवे तर सोबतीला मदतनीस हवीच आहे आवश्यक बनले आहे सदर गुन्हा फास्टट्रॅक कोर्टात चालवून गुन्हेगाराला लवकरात लवकर फाशी द्यावी.

शरद पवार सरपंच चिंचोलीकेला.

Post a Comment

0 Comments