Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे यांचा तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये झंजावती गाव भेट दौरा सुरू, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे यांचा तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये झंजावती गाव भेट दौरा सुरू, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आज मंगळवार दिनांक 15 रोजी धाराशिव तालुक्यातील  सारोळा काजळा गावामध्ये नागरिकांशी संवाद साधताना अण्णासाहेब दराडे 

तुळजापूर/राजगुरु साखरे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तुळजापूर तालुक्यात तर इच्छुकांची भाऊ गर्दी दिसून येत आहे त्यात शेतकरी पुत्र अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे हे निवडणूक रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित झालं आहे. आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली असून निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. तर शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे यांनी गेल्या दोन महिनाभरापासूनच गाव भेट दौऱ्याला सुरुवात देखील केली आहे. ते मतदार संघातील प्रत्येक गाव खेड्यापर्यंत जाऊन जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांच्या या दौऱ्याला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. शेतकरी पुत्रच आमदार का असावा? याचे महत्व ते जनतेला पटवून देत आहेत. ते ज्या पद्धतीने मांडणी करत आहेत ते जनतेला खूपच भावत आहे, जनतेच्या मनात घर करत आहे. यातून विधानसभेचे मैदान मारण्यासाठी शेतकरी पुत्र दराडे यांनी चांगलीच कंबर कसल्याचे दिसून येत आहे. यामुळं अनेक प्रस्थापित नेत्यांचं टेन्शन वाढल्याचं बोललं जात आहे. 






गावभेट दौऱ्याला मिळणारा हा उदंड प्रतिसाद आम्हाला भारावून टाकणारा आहे. आगामी निवडणूक ही काही राजकीय पक्षांची, लोकसभेची निवडणूक नाही तर ही "जनतेची निवडणूक" जनतेनेच हातात घेतल्याचं स्पष्ट जाणवतय. कितीही मोठी प्रस्थापितांची, धनशक्तीची ताकत उभी राहिली तरी सामान्य जनतेच्या "जनशक्ती"चा विजय निश्चित आहे.

                         अण्णासाहेब दराडे शेतकरी पुत्र

Post a Comment

0 Comments