नळदुर्ग : सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदृग जवळील घाटात मज्जिद जवळ कंटेनर आणि मोटरसायकल अपघातात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांचे सहकारी हे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग जवळील मज्जिद जवळील घाटात दि, 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:40 वाजण्याच्या सुमारास मोटार सायकल व कंटेनरच्या झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकल क्र. MH- 25 -AT -1712 वरील पोलीस कर्मचारी उमरगा येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हिराचंद दिनकर मुळे वय(३०) हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले तर त्यांचे सहकारी गहिनाथ विठ्ठल बिराजदार वय (32 )हे गंभीर जखमी झाली आहेत हे दोन्ही पोलीस कर्मचारी उमरगा येथील पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत हे आपली ड्युटी संपल्यानंतर ते मोटरसायकल वरून धाराशिव कडे जात असताना नळदुर्ग जवळ राष्ट्रीय महामार्गावर सकाळी नऊ वाजून 40 मिनिटाच्या सुमारास पाठीमागून आलेल्या कंटेनर क्रमांक NL-01बी.एल.7972 याने मोटरसायकल ला पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे भीषण अपघातात झाला आहे हा अपघात खड्डा चुकवण्याच्या नादात झाला आहे. महामार्गावर पडलेल्या खड्डे बुजवण्याची वारंवार मागणी केल्यानंतरही राष्ट्रीय महामार्ग विभाग व महामार्गावरील टोलनाका चालक कंपनी येत नाही. या खड्ड्यामुळे निष्पाप लोकांचा जीव जात आहे त्यामुळ अपघातास कारणीभूत असलेल्या संबंधित विभागावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त नागरिकांतून होत आहे.
0 Comments