Hot Posts

6/recent/ticker-posts

नियुक्ती पत्रावर वरिष्ठांची सही घेऊन ऑर्डर देण्यासाठी १० हजाराची लाच स्वीकारणाऱ्या २ जणी एसीबीच्या जाळ्यात

धाराशिव: अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्ती पत्रावर वरिष्ठांची सही घेऊन ऑर्डर देण्यासाठी १० हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक महिलेसह अंगणवाडी सेविकेस एसीबीने सापळा रचून ताब्यात घेतली ही कारवाई शुक्रवारी दिनांक 18 रोजी तुळजापूर येथील कार्यालयात करण्यात आली.

याबाबत एसीबी कडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या पत्नीचे तुळजापूर तालुक्यातील चिंचोली येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्तीची पत्र प्रलंबित होते सदरील नियुक्तपत्रावर वरिष्ठांचे स्वाक्षरी घेऊन ऑर्डर देण्यासाठी तुळजापूर येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक मई बळीराम खांडेकर वय (34) या कर्मचाऱ्यांनी चिंचोली येथे अंगणवाडी सेविका असलेल्या सोनाली संदीप कदम वय (28) यांच्यामार्फत 15 हजार रुपयांची लाच मागितली तसेच तडजोडीअंती दहा हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले त्यानंतर फिर्यादी यांनी लाचलुचपत प्रतिबंधित पथकाकडे संपर्क साधून याबाबत रीतसर तक्रारीतील त्यानुसार दिनांक 18 रोजी प्रथम पंच पाठवून याबाबतची खातर जमा करण्यात आली त्यानंतर सापळारचून कनिष्ठ सहाय्यक खांडेकर यांना लाचेची दहा हजार रुपयाची रक्कम स्वीकारल्यानंतर ताब्यात घेण्यात आली यावेळी उपस्थित असलेल्या सोनाली कदम या दुसऱ्या आरोपीसह पथकाने ताब्यात घेतली या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होते. हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक विकास राठोड यांनी पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम मेहेत्रे व पोलीस अधीक्षक संदीप पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी केला या सापळा पथकात पोलिस अंमलदार मधुकर जाधव विशाल डोके जाकीर काजी व चालक दत्तात्रय करडे आदी या कारवाईमध्ये सहभागी होते.

Post a Comment

0 Comments