निवडणुकीपाठोपाठ लग्नसराईचा उडणार बार सर्वाधिक मुहूर्त फेब्रुवारी ते मे महिन्यात मंगल कार्यालय आरक्षित करण्यास सुरुवात
धाराशिव/राजगुरु साखरे: यंदा नोव्हेंबर पासून लग्नाचे मुहूर्त आहेत पुढील आठ महिन्यात 52 मुहूर्त आहेत खालील तब्बल 21 मुहूर्त फक्त फेब्रुवारी आणि मे या दोन महिन्यात आहेत लग्न इच्छुकांच्या डोक्यावर यंदा नोव्हेंबर पासूनच अक्षता पडण्यास प्रारंभ होणार आहे. यावर्षी 18 नोव्हेंबर पासून लग्न सोहळ्याचा मुहूर्ताला प्रारंभ होत आहे. लग्न जुळलेल्यांची कुटुंबीयांनी आतापासूनच मंगल कार्यालय आरक्षित करण्यास सुरुवात केली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा लग्नसराईचा कालावधी आठ महिन्याचा आहे नोव्हेंबर ते जून या काळात लग्नाची एकूण 52 शिमूर्त आहेत त्या अनुषंगाने शिक्षकांची तयारी सुरू झाली आहे वर वधू मंडळीही लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. अनेक सामाजिक संस्था मंडळानेही विवाह इच्छुक वर वधूचे मेळावे आयोजित करून लग्नाच्या रेशीमगाठी बांधण्यात सहकार्याची भूमिका घेतली आहे. विविध ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन पार पडत आहेत.
आठ महिन्यातील विवाह योग्य मुहूर्त
नोव्हेंबर :- 18, 22, 25, 27
डिसेंबर:-9, 2 ,5 ,6 ,11
जानेवारी:-16 ,19 ,20 ,23, 24,30
फेब्रुवारी:- 2,3,7,16,19,20,21,23,26
मार्च:-2,3,6,7
एप्रिल:- 26,28,20,22,23,25,30
मे। :- 1 ,7,8,9,11,18,19,22,23,25,28
जून:1,2,3,4
फेब्रुवारी व मे मध्ये सर्वाधिक मुहूर्त
नोव्हेंबर 30 जून या आठ महिन्याच्या काळात एकूण 52 मुहूर्त आहेत यापैकी फेब्रुवारीमध्ये 10 मे महिन्यात 11 मिळून एकूण 21 असे मुहूर्त आहेत सर्वात कमी मुहूर्त डिसेंबर मार्च व जून महिन्यात आहेत.
मे महिन्याला पसंती
मे महिन्यातील मुहूर्ताला पसंती मे महिन्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे या दिवसातील मुहूर्त साधण्यात येतात.गेल्या मे महिन्यात नेमकी मुहूर्त नव्हती मात्र यंदा नवीन वर्षात मे महिन्यात मुहूर्त अधिक असल्याने सर्वाधिक लग्न मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.
मंगल कार्यालय बुकिंग ला प्रारंभ
लग्नानंतर वैवाहिक जीवनाला सुरुवात होते विवाह सोहळा हा दोन कुटुंबातील महत्त्वाचा आनंद सोहळा असतो यासाठी प्रशस्त मंगल कार्यालय पार्किंग व्यवस्था असलेल्या ठिकाणच्या अधिक पसंती दिली जाते धावपळ टाळण्यासाठी आधीपासुनच मंगल कार्यालय बुकिंग करण्यात सुरुवात झाली आहे
0 Comments