धाराशिव जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.५९ टक्के मतदान सर्वात कमी उस्मानाबाद तर सर्वात जास्त तुळजापूर
धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - विधानसभेच्या निवडणुकीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाला आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर आपला मताचा अधिकार बजावला असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत चारही मतदार संघांमध्ये सरासरी टक्के मतदान झाले आहे.
जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद व परंडा या ४ विधानसभा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे.
यामध्ये उमरगा ५७.८८ टक्के तर तुळजापूर ६२.२६ टक्के तसेच उस्मानाबाद ५६.२२ टक्के व परंडा ५७.६० टक्के असे एकूण सरासरी ५८.५९ टक्के मतदान झाले आहे. सर्वात जास्ती तुळजापूर विधानसभा मतदार संघात ६२.२६ टक्के तर सर्वात कमी उस्मानाबाद या मतदार संघांमध्ये ५६.२२ टक्के मतदान झाले आहे.आज सकाळी सातपासून निवडणूक सुरुवात झाली आहे. सकळापासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. विशेषतः महिलांच्या रांगा दिसून येत आहेत. ग्रामीण भागात सकाळच्या सत्रात बऱ्यापैकी मतदान झाले आहे. शहरी भागात मात्र थंडीमुळे थोडे उशिरा मतदार केंद्रावर येताना दिसत आहेत.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत मराठवाड्यात झालेल्या मतदानाची जिल्हानिहाय टक्केवारी -
छत्रपती संभाजीनगर ६०.८३%
बीड ६०.६२%
धाराशिव ५८.५९%
हिंगोली ६१.१८%
जालना ६४.१७%
लातूर ६१.४३%
नांदेड ५५.८८%
परभणी ६२.७३%
0 Comments