Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे 61 टक्के मतदान

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे 61 टक्के मतदान 


चिवरी: तुळजापूर 241 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान दि, 20 रोजी तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे शांततेत पार पडले. एकूण 61℅ मतदान झाले आहे, येथील 2718 मतदारांपैकी 1680 नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

यामध्ये बुथ क्रमांक -314 मध्ये एकुण 1356 मतदारांपैकी स्ञी मतदान - 371 पुरुष -442 तसेच बुथ क्रमांक 315 मध्ये एकूण 1362 मतदारांपैकी स्ञी  मतदान -373 पुरुष- 494 असे मतदान झाले. यामध्ये बुथ क्रमांक 314 मध्ये एकूण मतदान 813 तर बूथ क्रमांक 315 मध्ये एकूण मतदान 867 असे झाले. सकाळी 10 वाजल्यापासून   मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होते. त्यानंतर दुपारी चार वाजेच्या नंतर काही प्रमाणात गर्दी दिसून आली. महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड धीरज पाटील यांच्यात चुरस दिसून आली. प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मागील विधानसभा सभेच्या तुलनेत यावेळीच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली असल्याचे दिसून आले.

Post a Comment

0 Comments