Hot Posts

6/recent/ticker-posts

हृदयद्रावक: आईने दोन चिमुकल्यासह केली आत्महत्या तुळजापूर तालुक्यातील घटना

हृदयद्रावक: आईने दोन चिमुकल्यासह केली आत्महत्या तुळजापूर तालुक्यातील घटना


धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील घट्टेवाडी येथे पोटच्या मुलाला व मुलीला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ता. २४ रोजी सायंकाळी घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की राधिका गणेश घट्टे (वय २५) हिने श्रेया गणेश घट्टे (वय २) व श्रेयस गणेश घट्टे वय (४ महिने) या बालकांना घरातील वेगवेगळ्या पाण्याच्या ड्रम मध्ये बुडविले. स्वतः घरातील पत्र्याच्या आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची फिर्याद मयत राधिका हिच्या दिराने नळदुर्ग पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

याबाबत पोलीस कडून मिळालेल्या अधिक माहिती अशी की घट्टेवाडी तालुका तुळजापूर येथे 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी राधिका धनेश घट्टे वय 25 राहणार घट्टेवाडी ही महिला राहत्या घरी स्वयंपाक घरात छताच्या पत्र्याखालील लोखंडी पाईपला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली त्याच घरात पाण्याने भरलेल्या दोन बॅरेल मध्ये राधिका धनेश घट्टे यांची दोन मुले श्रेया व श्रेयश हे मृत अवस्थेत आढळून आले एकाच घरातील आई आणि दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच नळदृग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगूने यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आई आणि दोन लहान मुलांचा मृत्यू नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही याबाबतचा अधिक तपास नळदृग पोलीस करत आहेत.

काटगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून नळदुर्ग येथील आरोग्य केंद्रात तिघांचा मृतदेह ठेवण्यात आला होता. दि.२५ रोजी दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घट्टेवाडी येथे सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


सायंकाळच्या वेळी दाराला कुलूप

घटना सायंकाळच्या वेळी घडली घरात कोणीच नव्हते घराला आतून कुलूप लावलेले होते दोन्ही मुले पाण्याच्या बॅरेल मध्ये मृता अवस्थेत आढळली आईचा मृतदेह घरातील लोखंडी पाईपला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला शेतातून पती सासू-सासरा आल्यानंतर दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण आतून प्रतिसाद न आल्याने दरवाजा तोडून पाहिले असता दोन्ही मुले व महिला मृत अवस्थेत आढळून आली

Post a Comment

0 Comments