तुळजापूर प्रतिनिधी : महाविकास आघाडीचे तुळजापूर विधानसभा अधिकृत उमेदवार श्री कुलदीप भैय्या धिरज पाटील कदम यांनी आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये 'आप ' पार्टीला सम्मान पुर्वक वागणुक देऊ असा शब्द दिल्यामुळे आम आदमी पार्टीचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते श्री .मधुकर शेळके यांनी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी ने महाविकास आघाडी तुळजापूर उमेदवारांस राष्ट्रीय व प्रदेश कार्यकारणीच्या आदेशानुसार पाठिंबा जाहिर केला आहे .
तसेच यापुर्वीही संपूर्ण राज्यभरात आप ने लोकसभा निवडनुकीतही इंडिया घटबंधन उमेदवारांना निवडुण आणण्याकरिता मोठा हातभार लावला होता .त्याचप्रमाणे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पुर्ण ताकतीनी महाविकास आघाडी उमेदवारांना पक्षाच्या आदेशानुसार निवडून आणण्यासाठी बळ लावणार आहोत अशी माहिती दिली आहे .
तुळजापूर तालुका महाविकास आघाडी
उमेदवाराप्रमाणे धाराशिव कळंब येथील महाविकास आघाडी उमेदवाराने आम आदमी पार्टी पदाधिकारी तसेच जिल्हा कार्यकारणी समन्वय संपर्क साधावा अशी माहिती प्रेस नोट च्या माध्यमातून आज तुळजापूर येथे दिली .
0 Comments