Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर : आम आदमी पार्टी च्या मागणीला यश शुद्ध पाणीपुरवठा शहरात सुरु "

तुळजापूर : आम आदमी पार्टी च्या मागणीला यश शुद्ध पाणीपुरवठा शहरात सुरु "

-----------------------------------


तुळजापूर -आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मधुकर शेळके यांनी मा .जिल्हाधिकारी साहेबांना तुळजापुर शहरात अशुद्ध पाणीपुरवठा होत असलेबाबत मुख्याधिकारी नरपरिषद यांचे निलंबन व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती कारण वारंवार सांगून हि शहरात अशुद्ध पाणी पुरवठा सुरूच होता तरी आम आदमी पार्टी तुळजापुर शहराध्यक्ष किरण यादव यांनीही शहरात होत असलेल्या अशुद्ध  पाणीपुरवठा बाबतचा  विषय उचलुन धरला होता तरी सदर निवेदनाची दखल घेऊन तात्काळ तुळजापुर शहरात शुद्ध पाणी पुरवठा नगरपरिषद प्रशासनाच्या माध्यमातून पाणी टेस्टिंग लॅब तपासणी केली व संबंधीत यंत्रने मार्फत शहरात पाणी पुरवठा सुरु केला .

 नेहमीच आम आदमी पार्टी सर्वसामान्य जनतेच्या मुलभुत प्रश्नावर पाणी आरोग्य विज सुविधा प्रश्नांवर आवाज उठविला आहे व त्याचा पाठपुरावा घेतला आहे .

Post a Comment

0 Comments