तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील तिसऱ्या आघाडीचे शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे यांची प्रचारात आघाडी
तुळजापूर/राजगुरु साखरे: तुळजापूर विधानसभा निवडणूक अगदी सात दिवसांवर आली असता तालुक्यातील विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच आपले असून प्रत्येक उमेदवार कॉर्नर सभा व डोर टू डोअर भेटी देत आम्हालाच मतदान करा अशी आव्हान करीत असल्याचे दिसून येत आहे. पण महायुती महाविकास आघाडी ,समाजवादी पार्टी, तिसरी आघाडी यांच्यामध्ये तालुक्यात चौरंगी लढत होत असल्याचे दिसून येत आहे. तिसऱ्या आघाडीचे प्रहार जनशक्ती पक्षाकडून शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे यांना उमेदवारी मिळाली आहे त्यांनी तुळजापूर तालुका व धाराशिव तालुक्यातील बहात्तर गावात मागील दोन महिन्यापासून चित्र रथाच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेट देऊन सर्वसामान्य शेतकरी ,कष्टकरी, तरुण विद्यार्थी तळागाळातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत भविष्यात समाज उपयोगी करणाऱ्या कामाची माहिती दिली. श्री दराडे यांनी अगदी तालुक्यातील ग्रामीण भागात वाडी वस्ती तांड्यावर जाऊन शेतकरी पुत्रच आमदार का व्हावा याचे महत्त्व पटवून सांगत आहेत, या त्यांच्या प्रचार दौऱ्यास नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील तिसरी आघाडीचे उमेदवार अण्णासाहेब दराडे हे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवत असल्याने त्यांना स्वतःलाच सर्व प्रचार यंत्रणा सांभाळावी लागत आहे. सध्या तरी तिसऱ्या आघाडीचे प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब दराडे यांची प्रचारात जोरदार आघाडी असल्याचे चित्र दिसून येत आहेत.
0 Comments