Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा ! 2100 रुपयांच्या घोषणेची अंमलबजावणी होणार का ?

जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा !

2100 रुपयांच्या घोषणेची अंमलबजावणी होणार का ?


धाराशिव : मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्रात देखील लाडक्या बहिणींना कमाल केली मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्रातील भाजप महायुतीला लाडक्या बहिणींना सत्ता मिळवून देण्यात मोठी कामगिरी केली आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करून त्याची अंमलबजावणी सुरू केली निवडणुकीपूर्वीच पाच हप्ते देखील जमा केले त्यामुळे महायुतीला निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे.आता मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर नवीन जीआर काढून अनेक जाचक अटी व निकष लावून अनेक महिला या योजनेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे .लाडक्या बहिणीकडून सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सर्वाधिक प्रभावी ठरली. या योजनेमुळे भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 101 जागा मिळाल्या तर महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या लाडक्या बहिणींना निवडणुकीनंतर दीड हजारावरून दोन हजार शंभर रुपये देण्याच्या आश्वासन महायुती सरकारने निवडणूक प्रचारात दिले होते. त्यामुळे आता विजयानंतर महायुती सरकारकडून वाढीव रकमेसह योजनेचा असावा हप्ता कधी मिळणार? याची प्रतीक्षा लाडक्या बहिणी करीत असल्याची चर्चा रंगत सुरू आहे. महा इती कडून लाडकी बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला महायुतीचे सरकार आले तरच या योजनेचा लाभ मिळेल अशी देखील सांगण्यात आले . यामुळे विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली. महायुती सरकार विक्रमी मताधिक्याने पुन्हा एकदा सत्तेवर आले लाडक्या बहिणींना भरभरून मतदान केल्याने मोठा विजय मिळवणे शक्य झाले आता लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे .सहाव्या हप्त्याची रक्कम खात्यात कधी जमा होणार याची चर्चा आता लाडक्या बहिणीमध्ये सुरू आहे या योजनेअंतर्गत अद्याप पर्यंत पाच हप्ते बहिणीच्या खात्यात जमा झाले आहेत जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या बहुतांश महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. राज्यात लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला होता.

त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला तसेच नोव्हेंबर मध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे एकत्रित पैसे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली होती. यामुळे पात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत पाच हप्त्याची साडेसात हजार रुपये जमा झाले आहेत दरम्यान आचारसंहिता काळात या योजनेचा लाभ देता येत नसल्याने निवडणुका संपताच लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा करण्याची आश्वासन दिली होती त्यामुळे आता निवडणुका संपल्या असून लाडक्या बहिणींच्या खात्यात सर्व हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा ? जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला लागली आहे.

आतापर्यंत असा मिळाला लाभ

  • जुलै 2024 पासून योजना सुरू करण्यात आली
  • जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित दोन्ही हप्ते जमा
  • सप्टेंबर महिन्यातील हप्ताही लाडक्या बहिणींना मिळाला
  • आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे एकत्रित पैसे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात जमा
वाढीव रकमेसाठी लागणार वेळ !
महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारावरून दोन हजार शंभर रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते आता माहितीचे सरकार आल्याने लाडकी बहिण योजनेचा हप्ता 2100 रुपये होणार का अशी चर्चा महिलामध्ये मध्ये रंगत आहे. दरम्यान हा धोरणात्मक निर्णय असल्याने मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित आहे यामुळे वाढीव हप्त्यास वेळ लागण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments