Hot Posts

6/recent/ticker-posts

माळशिरस तालुक्यातील दसुरपाटी यल्लम्मा देवी यात्रा १३ डिसेंबर पासुन प्रारंभ, विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

माळशिरस तालुक्यातील दसुरपाटी यल्लम्मा देवी यात्रा १३ डिसेंबर पासुन प्रारंभ, विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन


माळशिरस: तालुक्यातील दसुरपाटी येथे सालाबादप्रमाणे ग्रामदैवत  यल्लम्मा देवीची यात्रा दि .12 आणि 13 डिसेंबर रोजी संपन्न होणार आह़े .एक दिवस नैवेद्य आणि एक दिवस होम अशाप्रकारे दोन दिवस हा उत्सव चालतो .होमदिवशी  15 ते 20 फूट अशा खणलेल्या चरेमध्ये पेटती लाकडे असतात त्यावरून देवीचे पुजारी नग्न पायाने चालत जातात ,हे या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य असते .राज्य महामार्गावर दसुरपाटी गाव वसले असल्यामुळे हा होम बघण्यास प्रचंड गर्दी असते .या दोन दिवसात मनोरंजनाचे विविध कार्यक्रम ही असतात.परिसरातील सर्व नागरिकांनी यात्रेस उपस्थित राहून शांततेत यात्रा पार पडण्यासाठी सहकार्य करावे  ,असे आवाहन यात्रा कमिटीने केले आह़े .

प्रतिनिधी संजय निंबाळकर. दसुर

Post a Comment

0 Comments