Hot Posts

6/recent/ticker-posts

आई राधा उदो उदो सदानंदीचा उदे उदे चा जयघोषाने भगवती देवीची यात्रा उत्साहात साजरी

आई राधा उदो उदो सदानंदीचा उदे उदे चा जयघोषाने भगवती देवीची यात्रा उत्साहात साजरी-


नाई चाकूर प्रतिनिधी : उमरगा तालुक्यातील (भगतवाडी) नाई चाकूर येथे उंच डोंगरावर बसलेल्या भगवती देवीची यात्रा दिनांक 31/12/2024 वार मंगळवार रोजी आई राजा उदे उदे सदानंदीचा उधे उंधे बोल भवानी माते की जय जयघोषाने भगवती देवीची यात्रा उत्साहात साजरी यात्रेला महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश राज्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून भगवती देवीला भक्तगण मोठ्या संख्येने यात्रेला येतात वेळ आमवस्याच्या दुसऱ्या दिवशी भगवती देवीची यात्रा भरवली जाते भक्तगण यात्रेला येताना आपल्या घरातील माळ परडी पोत घेऊन येतात व उंच डोंगराच्या दोन्ही पायऱ्याच्या बाजूने माळ परडी घेऊन जोगवा मागतात भक्तगण  रात्रभर आराध्याचा गाणे म्हणत होते पहाटे देवीचे पुजारी रणधीर चव्हाण यांच्या हस्ते देवीला अभिषेक करून देवीला पातळ नेसवण्यात आले.

 भक्तगण आपला नवस फिरण्यासाठी  डोळे टिळे तेल आईला पातळ नेसवण्यासाठी मंदिरात एकच गर्दी केले होते यावर्षीचे यात्रेचे विशेष म्हणजे 31 डिसेंबर त्या देवीला पुरणपोळी कोंबडी बकरीचा निवेद चालतो मंगळवार असल्यामुळे बरेच जण आपल्या नवस फेडण्यासाठी त्यात आज  कर आहे 31 डिसेंबर आहे योग साधून आला आहे त्यामुळे एकटेच डिसेंबरच्या रात्री करण्यात येणारी पार्टी आज दिवसभर मंगळवार असल्यामुळे आईच्या दरबारी कंदुरी केले.

माळ परडी घेऊन डोंगराच्या चहुबाजूने भक्तगण परडी घेऊन बसतात भाविक भक्त परडीत पीठ मीठ तेल टाकतात यात्रेचे विशेष म्हणजे दुपारी आईचा छबिना निघतो यात्रेत लाखो भाविक भक्त असतात यात्रेत छबिना निघाल्यानंतर छबिन्याला वाट मोकळी केली जाते भाविक भक्त सकाळी लवकर आल्यानंतर आपले घरात लागणारे वर्षभर कुंकू हळद हे देवीच्या यात्रेतून घेऊन जातात बाजार केल्यानंतर छबिना निघाल्यानंतर भक्तगण आपल्या गावाला आई राजा उदो उदय सदानंदीच्या उदो उदयच्या जयघोषाने आपल्या घराकडे निघून जातात पहाटेपासूनच महिलावर्ग देवीच्या पायथ्याशी असलेल्या तळ्यामध्ये अंघोळ करून ओल्या पडद्याने देवीच्या उंच डोंगरावर दंडवत घेतात व आपल्या देवीचा नवस फेडतात.

मकर संक्रातीच्या पंधरा दिवस अगोदर येणारी भगवती देवीची यात्रा त्या यात्रेत सुवासिन चुडे घेण्यासाठी महिलावर्ग आणि बांगड्या चुड्याच्या दुकानात गर्दी केली होती यात्रेत चूडे स्वस्त भेटतात ग्रामीण भाग असल्यामुळे आपल्या गावी चुडे भेटत नाहीत यात्रेतून महिलावर्ग चुडे खरेदी करतात

यात्रेला  पाळणे खेळणी कपडे मिठाई पेढे जिलेबी कांदा भजी केळीचे दुकाने व लहान मुलाचे अनेक खेळणी बांगड्याचे दुकान भांड्याचे दुकाने सौंदर्यप्रसाधनाचे दुकान हॉटेल व्यवसायिक मोठ्या संख्येने यात्रेत आपले दुकान मांडले आहे. 

यात्रेला माजी खासदार रवींद्र  गायकवाड ,माजी आमदार ज्ञानराज चौगुले उमरगा लोहारा तालुक्याची विद्यमान आमदार प्रवीण  स्वामी यांनी जगदंबा देवीचे दर्शन घेतले जगदंबा देवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब पवार सचिव बी के पवार व इतर सदस्यांनी मान्यवराचा सत्कार केले.

यात्रेकरूंना जगदंबा देवी ट्रस्टच्या , उमरगा पोलीस ठाण्याच्या पीआय अश्विनी भोसले पोलीस निरीक्षक गवळी, पीएसआय संजय सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल सतीश पाटील मौला शेख, एम, मडोळे इतर पोलीस कॉन्स्टेबल  चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.








Post a Comment

0 Comments