Hot Posts

6/recent/ticker-posts

रासायनिक खतांची दरवाढ कोणाच्या फायद्याची ?- Chemical fertilizers:

रासायनिक खतांची दरवाढ कोणाच्या फायद्याची ?संभाव्य खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांची घालमेल शेतकऱ्याचे बजेट कोलमडणार 

शेतकऱ्याचा प्रश्न : नवीन वर्षात एक जानेवारीपासून लागू होणार दरवाढ


धाराशिव /राजगुरु साखरे : एकीकडे वाढलेल्या उत्पादन खर्चाने शेतकरी त्रस्त आहेत तर उत्पादनातून पीक लागवडीचा खर्च निघणेसा झाला आहे. पिकांना मिळणारा हमीभाव जेमतेम आहे खुल्या बाजारात शेतकऱ्यांची लूट होत आहे सध्या बाजारात भाजीपाल्याचे दर कमालीने घसरले आहेत यातून पीक लागवड व काढणीचा खर्च निघणेसा झाला आहे.एक जानेवारीपासून खत उत्पादक कंपन्याने रासायनिक खतांसाठी नवी दरवाढ जाहीर केली आहे त्यामुळे ही दरवाढ कुणाच्या फायद्याची ? असा प्रश्न सध्या शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.

यामुळे खत विक्रेत्यांनीही संभाव्य खत भाव वाढीचा निषेध नोंदवला आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही भाववाढ अन्यायकारक असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. राज्यात रासायनिक खतांच्या किमती अगोदरच  जास्त असताना सुद्धा आता खत उत्पादक कंपनीने 1 जानेवारी 2025 पासून दरवाढ जाहीर केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना  अतिरिक्त आर्थिक भार सोसावा लागणार आहे.

शासनाची ही कृती शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरणार आहे . सोयाबीन,तर , हरभरा,गहू , ज्वारी या शेतमालाचे भाव खुल्या बाजारात शासनाचे हमीभावापेक्षा खाली आहेत. वेळेत हमीभावाने माल खरेदी करण्याची व्यवस्था नाही परिणामी शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना माल विकावा लागत आहे; परंतु खाजगी व्यापारी शेतकऱ्यांना अक्षरशा लुटत आहेत खत कंपन्यांनी खतांची भाव वाढ जाहीर केली आहे रासायनिक खताची दरवाढ शेतकऱ्यावर अन्याय करणारी आहे.

रसायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यावर अन्याय करणारी आहे एकीकडे शेतमालाचे भाव कमी होत असताना खतांची भाव वाढ करून सरकार शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेत आहे तर दुसरीकडे खत उत्पादक कंपन्यांना मालामाल करीत असल्याची नाराजी शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे.

शासनाची उद्योजकांना साथ शेतकऱ्यांना पाठ

जिल्ह्यात यंदा दिवाळी संपून दीड महिना लोटल्यानंतर शासनाकडून सोयाबीन साठी शासकीय हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले त्यातच मिळणारा हमीभाव शेतमालाच्या खर्चावर आधारित नाही त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो हमी खरेदी केंद्रावर सोयाबीनची प्रत खराब असल्याचे कारण समोर करून परत पाठवण्यात येत आहे तसेच प्रति क्विंटल 130 रुपये खर्च होत आहे   शासन शेतकऱ्याच्या पाठीशी असल्याचे सांगते मात्र रासायनिक खताची दरवाढ करून शासनाने उद्योजकांनाच साथ दिली याची खंत शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

नवीन खतांची दरवाढ खालील प्रमाणे


खतसध्याचे दरवाढीव दरवाढ (रुपये/प्रतिबॅग)
डीएपी१,३५०१,५९०२४०
संयुक्त खते (एनपीकेएस)१,४७०१,७२५२५५
टीएसपी (४६ टक्के)१,३००१,३५०५०

Post a Comment

0 Comments