Mango Blossom:थंडीचा आंब्याला फायदा झाडांना फुटला मोहर,-Mango Flowering Season
तुळजापूर: तालुक्यातील परिसरात यंदा कडाक्याची थंडी पडत आहे या थंडीचा शेत शिवारातील आंब्याच्या झाडाला चांगलाच फायदा झाला असून अनेक झाडांना मोहर फुटला आहे.त्यामुळे यंदा आंब्याचा सिझन चांगला राहण्याची शक्यता शेतकरी वर्तवत आहेत.
तुळजापूर तालुक्यातील बहुतांश शेत शिवारात डिसेंबर महिन्याची अखेरपर्यंत अनेक झाडांनी मोहर भरला आहे यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा आंब्याच्या झाडाला लवकर मोहर लागला आहे त्यामुळे यंदा कैरीची चव लवकर चाखता येणार आहे. गेल्या वर्षी अवकाळीचा देखील फटका बसला होता परंतु यंदा मागील दीड महिन्या अगोदर थंडीचा जोर चांगलाच राहिल्याने याचा आंब्याच्या झाडाला फायदा झाला आहे. गेल्या तीन-चार वर्षानंतर यंदा आंब्याच्या झाडाला मोहर मोठ्या प्रमाणावर लागलेली दिसून येत आहेत त्यामुळे यावर्षी फळांचा गोडवा चांगला राहण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसापासून थंडीचा कडाका वाढत आहे त्यामुळे त्याचाही आंब्याला फायदा होत आहे.
0 Comments