वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्यपदी डॉ नितीन ढेपे यांची निवड
धाराशिव : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वंचित बहुजन आघाडीच्या पक्षांतर्गत निवडणुका आज दिनांक 10 डिसेंबर रोजी शेगाव येथे पार पडल्या. यावेळी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माननीय प्रकाश आंबेडकर यांची आणि राष्ट्रीय कार्यकारणी मधील बारा सदस्य यांची एकमताने निवड केली गेली. त्यामध्ये डॉ नितीन ढेपे यांचा समावेश आहे.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथील डॉ नितीन ढेपे हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे त्वचारोग तज्ञ असून त्यांना लेसर मॅन म्हणून गौरविले जाते. ते राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे राष्ट्रीय संघटक असून ओबीसी विचारवंत म्हणून त्यांचा लौकिक आहे.
वंचित बहुजन आघाडी आता आपला पाया ओबीसी वर्गात विस्तारत आहे. ओबीसी अरक्षण, सर्व समावेशक हिंदुत्व, आरोग्य, शिक्षण आणि रोजगारनिर्मिती यावर नावीन्यपूर्ण उपाय योजना अशा विषयावर वंचितच्या थिंक टँक मध्ये डॉ नितीन ढेपे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
0 Comments