तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांचे ग्रामस्थांकडून कौतुक
चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे 76 वा प्रजासत्ताक दिन रविवारी दि,२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे आणि ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत आणि ध्वजगीताने ध्वजाला मानवंदना दिली गेली. विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले यामध्ये कवायत प्रात्यक्षिके, विद्यार्थ्यांची भाषणे समूहगीत गायन, राष्ट्रभक्तीपर गीतावर नृत्य सादर करण्यात आले. तसेच गावातील नागरिकांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे आर एस गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवर उपस्थित शालेय समितीचे अध्यक्ष अविनाश जाधव माजी शालेय समिती अध्यक्ष सचिन शिंदे वंचित बहुजन आघाडीचे आर .एस गायकवाड, सुभाष चिमणे,पञकार राजगुरु साखरे,नेताजी शिंदे,संतोष साखरे मुख्याध्यापक राहुल मसलेकर,सहशिक्षक अण्णासाहेब भोंग,सहशिक्षक म्हेत्रे सर, मोहन राजगुरू , सहशिक्षक शरद सोनटक्के,सहशिक्षिका अनुष्का मनशेट्टी अंगणवाडी सेविका मदतनीस आशाकार्यकर्त्या ,आदीसह महिला ,ग्रामस्थ,तरूण पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments