पिस्ता शेंगदाणे खाणे स्मरणशक्तीसाठी उपयुक्त!Health Tips -pista shengdane
नमस्कार आजच्या लेखामध्ये आपण स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कोणत्या घटकाची आवश्यकता आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.
दररोज पिस्ता शेंगदाणे अक्रोड या प्रकारच्या सुक्या मेव्याचे सेवन केल्यामुळे आकलन शक्ती, शिकण्याची प्रक्रिया ,स्मरणशक्तीसह मेंदूच्या इतर कार्यामध्ये सुधारणा होत असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. पिस्ता शेंगदाणे आणि अक्रोड यांचे नियमित सेवन केल्यामुळे मेंदूला चालना मिळत असल्याचे अमेरिकेतील लोमा लेंण्डा विद्यापीठातील संशोधकांना आढळून आले.
पिस्ता खाल्ल्यामुळे गामालहर प्रतिसाद निर्माण करतात जे संज्ञात्मक प्रक्रिया माहिती धारणा शिकणे समज आणि झोपेदरम्यान होणाऱ्या डोळ्यांच्या जलद हालचालीसाठी महत्त्वपूर्ण असतात. शेंगदाण्यांचा देखील या अभ्यासात समावेश केला असून शेंगदाण्यामुळे मेंदूमध्ये डेल्टा प्रतिसाद निर्माण होतात हे डेल्टा प्रतिसाद सक्षम रोग प्रतिकारशक्ती नैसर्गिक उपचार आणि गाढ झोपेशी संबंधित असतात.
संशोधकांनी सहा प्रकारच्या कठीण कवचाची फळांची चाचणी अभ्यासात केली असून या सर्वांच्या गुणधर्मामध्ये काही फरक आढळून आले या सर्वांमध्ये उपयुक्त अँटिऑक्सिडंट आढळून आले तर अक्रोड मध्ये अँटिऑक्सिडेंटचे सर्वात जास्त प्रमाण आढळून आले या आधीच्या अभ्यासामध्ये अशा प्रकारच्या सुक्या मिळवायचे सेवन करणे हे रदयासाठी कर्करोगासाठी रुग्णांसाठी पोटातील जळजळ कमी करण्यासाठी महत्त्वाची असल्याचे मानले होते.
पण सुक्या मेव्याच्या सेवनामुळे मेंदूवर काय परिणाम होतो यावर फार कमी संशोधन करण्यात आले असल्याचे लोमा लेंडा विद्यापीठातील सहमुख्याध्यापक यांनी सांगितले हा अभ्यास एफ ए एस ई बी या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.
0 Comments