Hot Posts

6/recent/ticker-posts

चारित्र्याच्या संशयातून पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीला जन्मठेप लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल-Latur Session Court Order

चारित्र्याच्या संशयातून पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीला जन्मठेप लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल-


लातूर : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळणाऱ्या नराधम पतीला आजन्म कारावासाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे .शहरातील चौधरी नगर येथे 27 ऑगस्ट 2022 मध्ये ही घटना घडली होती याप्रकरणी सबळ पुरावे साक्षीदारांची साक्षी व मृत्यूपूर्वी महिलेने दिलेल्या जवाबावरून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

या प्रकरणाची थोडक्यात हकीगत अशी की प्रवीण वसंतराव टिंगरे हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असत यामधून पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत असत 27 ऑगस्ट 2022 रोजी मयत फिर्यादी अर्चना प्रवीण टिंगरे या अंघोळीसाठी पाण्याने भरलेला हंडा गॅसवर ठेवून तेथेच उभ्या होत्या दरम्यान पती प्रवीण घरातील पेट्रोलची बाटली ही अर्चना यांच्या अंगावर ओतली होती त्यामुळे गॅसचा भडका झाला त्या गंभीर जखमी झाल्या होत्या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अर्चना टिंगरे यांनी रुग्णालयात पोलिसांना जबाब दिला होता त्यांच्या जबाबदावरून येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात 307 व नंतर 302 कलम प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड यांनी तपास अंतिदोष आरोप पत्र न्यायालयात दाखल केले होते त्यानुसार येथील जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरू होती यादरम्यान सरकारी पक्षातर्फे 14 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली तसेच मृताचे नातेवाईक वैद्यकीय अधिकारी तसेच महिलांच्या जबाब नोंद देणाऱ्या पोलिसांची साक्ष घेण्यात आली होती तर आरोपीतर्फे केवळ एकाची साक्ष नोंदवली गेली होती.

14 जणांची साक्ष पुरावे महत्त्वपूर्ण

या प्रकरणांमध्ये मयताचा जवाब आणि 14 जणांचा साक्ष महत्त्वाच्या ठरल्या अनेक दिवस हे प्रकरण कोर्टात सुरू होते त्यामुळे नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते 14 जणांच्या वेगवेगळ्या बाजूने साक्षी आणि आरोपीकडून केवळ एकाची साक्ष या सर्व बाबी प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळी महत्त्वाच्या ठरल्या आहेत.

संतोष देशपांडे जिल्हा सरकारी अभियोक्ता  लातूर.

यांनी मांडली न्यायालयात बाजू

सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांना ग्राह्य धरून वसंतराव टिंगरे याला खून प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालय डी.बी माने यांनी दोषी ठरवले त्यानुसार वसंत यास जन्मठेपेची शिक्षा शुक्रवारी दिनांक 24 रोजी सुनावण्यात आली आहे सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता   संतोष देशपांडे यांनी काम पाहिले तर तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड हनुमंत चवडीकर पैरवी अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर.टी. राठोड एडवोकेट एम के बिरीकर व दिलीप नागराळे यांनी त्यांना सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments