रिल्सस्टार राहुल दादा पाटील यांचा नाईचाकूर येथे मित्र परिवारातर्फे सत्कार-Reels star rahul dada patil

Hot Posts

6/recent/ticker-posts

रिल्सस्टार राहुल दादा पाटील यांचा नाईचाकूर येथे मित्र परिवारातर्फे सत्कार-Reels star rahul dada patil

रिल्सस्टार राहुल दादा पाटील यांचा नाईचाकूर येथे मित्र परिवारातर्फे सत्कार-

नाईचाकूर प्रतिनिधी :उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील रहिवासी श्री राहुल दादा पाटील यांचे यूट्यूब  वर एक मिलियन मित्रपरिवार पूर्ण झाल्याबद्दल युट्युब  तर्फे त्यांचा विशेष गौरव करण्यात आला त्याबद्दल नाईचाकुर येथील पहिली ते दहावी वर्गमित्र तर्फे राहुल दादा व त्यांच्या टीमचा सत्कार करण्यात आला 1 जानेवारी 2025 नववर्षाची सुरुवातीला आपल्या मित्राचा सन्मान केला पाहिजे या येथूने नाहीतर मित्रांनी राहुल दादा व त्यांच्या सोबत असलेली सुनिता चव्हाण व इतर टीमचा सत्कार केले राहुल दादा हे कोरोना काळात महाराष्ट्रातील भारतातील मराठी नागरिकांना टिक टॉकच्या युट्युब च्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करत होता कोरोना काळात नागरिक घरात बसून होते घरात वेळ जात नव्हता राहुल दादा व त्यांचे टीमचे रीलस बघत असे राहुल दादा बघता बघता रील स्टार झाले त्याचे आज एक मिलियन म्हणजे दहा लाख मित्रपरिवार सोडला गेला आहे त्याच्या ग्रामीण भागातील युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोरंजन सादरीकरणाचा छोटासा प्रयत्न सुरू केला होता आज तो महाराष्ट्रातील मराठी माणसाचे ताईत बनला आहे.

 त्याच्याच या कला गुणाला वाव म्हणून धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंम्बासे यांनी 2024 लोकसभेच्या निवडणुकीत धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून राहुल दादा पाटील यांची नियुक्ती केली होती मतदान वाढविण्यासाठी राहुल दादा यांनी गावोगावी जाऊन लोकसभेला मतदान वाढवण्याची जनजागृती केली राहुल दादा लोकसभेला ब्रँड अँबेसिटर म्हणून ज्या गावात जात होते त्या गावात व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत होते व मतदान वाढीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न यशस्वी झाले व लोकसभेला चांगल्या पद्धतीने मतदान झाले आपलाच मित्र आज दहा लाख मित्रपरिवार युट्युब वर प्राप्त झाले आहे.

 युट्युब तर सर्व टीमचा सन्मान करण्यात आला राहुल दादा यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणले की माझा सत्कार महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी झाला पण माझ्याच लहानपणीच्या मित्राने आज माझा जो काही सन्मान केला आहे तो सन्मान आयुष्यभर माझ्या लक्षात राहील लहानपणी आपण एकत्र खेळलो धिंगा मस्ती खोटी खोटी कट्टी धरलो त्याच मित्रांच्या हातून माझा सन्मान व्हावा मि भागयवान आहे असेच मला सहकार्य करा व माझ्या आपण सत्कार केला त्याबद्दल मी सर्व मित्र कंपनीचे आभारी आहे असे सत्काराला उत्तर देताना राहुल दादा व त्यांच्या टीमने आपले मनोगत व्यक्त केल राहुल दादा यांचा सोबत असलेल्या टीम सुनिता चव्हाण राजू जाधव, टिपू भाई ,पिंटू माने, लखन घोटकर, सायली राठोड, ऋषीआईवळे ,सुशांत जवारे, शुभांगी गायकवाड, सारिका

 देवरुळकर ,संजना धुमाळ, त्यांचा सन्मान केला पाहिजे म्हणून नाईचाकूर येथील भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त लेफ्टनंट अरुण पवार उद्योजक वैभव पवार ,नंदू मोहिते, सुहास सनातन ,राम पाटील, राम भाले ,अमर पवार, विजय कुंभार, दत्ता लकडे, राजेंद्र मुसांडे ,ज्ञानेश्वर पाटील, नितीन पवार,ताजुद्दीन शेख, तमीज आतार, लक्ष्मण पवार, सिद्धेश्वर गरुड  मित्र उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणवंत पवार यांनी मांडले आभार प्रदर्शन उद्योजक वैभव पवार यांनी मांडले.



Post a Comment

0 Comments