धक्कादायक घटना: १४ वर्षाच्या मुलाने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या-Solapur Crime News
सोलापूर: माढा तालुक्यातील मौजे आढेगाव येथे 14 वर्षाच्या शाळकरी मुलांनी रिवाल्वर मधून डोक्यात गोळी झाडून राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दिनांक 27 रोजी दुपारी साडे बारा वाजता घडली आहे. श्रीधर गणेश नष्टे वय 14 असे मुलांची नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की श्रीधर हा सराटी तालुका इंदापूर येथील जिजामाता स्कूलमध्ये इयत्ता सातवी शिक्षण घेत होता आज घटने दिवशी तो आजारी असल्याने घरीच होता त्यांनी अज्ञात कारणाने सोमवारी दुपारी घराच्या वरच्या मजल्यावर जाऊन रिवाल्वर मधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली गोळीबाराचा आवाज ऐकून घरातील आई आजोबा व इतर धावत आली असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्थितीत आढळून आला. आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकले नाही टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे या करत आहेत.
मुलाच्या आत्महत्येसाठी तीन गोळ्या कशाला श्रीधरच्या मृत्यूवर वडिलांचा संशय
माढा तालुक्यातील आढेगाव येथील सातवी शिकणाऱ्या 14 वर्षीय श्रीधर गणेश नसते यांनी दिनांक 27 जानेवारी रोजी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती त्याचे वडील राजस्थान येथून रात्री एक वाजता दाखल झाल्यानंतर मध्यरात्री दोन वाजता त्याच्यावर आढेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले मृत्यूनंतर त्याचे वडील गणेश नष्टे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत आपल्या मुलाने आत्महत्या केली नसल्याचा त्यांनी संशय व्यक्त केला आहे.
श्रीधर यांनी डाव्या कांनसिलावर डोक्यात गोळी झाडून घेतल्याचे प्रथम दर्शनी स्पष्ट होत असले तरी श्रीधर हा उजवा होता असे वडिलांचे म्हणणे आहे त्यामुळे आत्महत्या केली असेल तर त्यांनी उजव्या कांशिलावर गोळी मारून घेतली असते श्रीधर यांनी आत्महत्या केली त्यावेळी घरी कोणी नव्हते त्यामुळे वडील गणेश नष्टे यांनी संशय व्यक्त केला आहे कसून तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे रिवाल्वर घरातील खालच्या रूम मधील कपाटात ठेवली होती तर घटना घराच्या वरच्या मजल्यावर घडली होती घटनेवेळी रिवाल्वर मृतदेहापासून लांब विरुद्ध दिशेला उजव्या बाजूला पडल्याने कुटुंबीय संशय व्यक्त करत आहेत.
फॉरेन्सिक रिपोर्ट कडे लक्ष
तपास योग्य चालू असून फॉरेन्सिक टीमचा अहवाल आल्यानंतरच सर्व बाजू स्पष्ट होतील असे पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे यांनी सांगितले.
लॉकरमध्ये रिवाल्वर ठेवलेली होती ती रिकामी होती रिवाल्वर घरातील मुलांना कधीच दाखवली नव्हती रिवाल्वर उघडायची कशी ती लोड करायची कशी याची माहिती नव्हती रिवाल्वर रिकामी असताना त्यात तीन गोळ्या होत्या संशय वाटत आहे.
गणेश नष्टे मुलांचे वडील
0 Comments