/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> बलसुर शिवारात ज्वारीला पाणी देत असताना विजेचा शॉक लागून दोन शेत मजुरांचा मृत्यू

Hot Posts

बलसुर शिवारात ज्वारीला पाणी देत असताना विजेचा शॉक लागून दोन शेत मजुरांचा मृत्यू

उमरगा : बलसुर शिवारात ज्वारीला पाणी देत असताना विजेचा शॉक लागून दोन शेत मजुरांचा मृत्यू


धाराशिव : उमरगा तालुक्यातील बलसुर शिवारात ज्वारीला पाणी देत असताना विजेचा शॉक लागून दोन शेतमजुराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना दिनांक 30 रोजी घडली आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की बलसुर -कडदोडा मार्गावरील सास्तुर तलावाजवळ ज्वारीला पाणी देत असताना विजेचा शॉक लागून दोन शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला कडदोडा येथील व्यंकट राम बालकुंदे वय (५९) व बलसुर येथील कुरशीद अमिरसाब बडगिरे वय (६०) असे मयतांचे नाव आहे. त्यांच्या या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments