Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा, शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पूजन , पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी शिवप्रेमींनी भगवे ध्वज हातात घेऊन, भगव्या रंगाचे फेटे बांधून ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आताषबाजीत शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली . तसेच छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव मंडळाकडून विविध  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी पाळणा सोहळा पार पडला. या याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी, तरुण, महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments