सातबाराच्या उतारावरील इतर हक्कातील वारसांची नावे त्या वारसांना नोटीस न बजावता सातबाराच्या उताऱ्याहून कमी करता येतील का ?
सातबाराच्या उतारावर ज्या ज्या नोंदी होतात त्या नोंदी हक्काबाबतच्या असतात त्या नोंदी रजिस्टर दस्ताद्वारे कायद्याच्या तरतुदी द्वारे किंवा न्यायालयाचे आदेशाद्वारे होतात जेव्हा एखाद्या व्यक्तीची वारस म्हणून सातबाराच्या उताऱ्यावर मालक व वक्तदार सदरील किंवा इतर हक्कांमध्ये नोंद करण्यात आलेली असेल तर ती नोंद असलेल्या व्यक्तीने त्यांच्या हिश्या बद्दल कोणत्याही प्रकारचा तब दिल्लीचा म्हणजेच ट्रान्सफरचा जास्त केल्याशिवाय कमी करता येत नाही. जेव्हा सातबाराच्या उताऱ्यावर नोंद असलेल्या कोणत्याही व्यक्तीची नोंद रद्द करावयाची असल्यास ती का व कोणत्या गोष्टीमुळे रद्द करावयाची आहे हे ठरवणे आवश्यक असते व तसे करायचे असल्यास उत्तरावर नाव असलेल्या व्यक्तीला नोटीस देऊन त्यांचे म्हणणे घ्यावे लागते बऱ्याच वेळा माननीय न्यायालयातून एखादा निकाल होतो त्या निकालाच्या आधारे निकाल ज्याच्या बाजूने झालेला आहे ती व्यक्ती महसूल अधिकारी यांना निकाल दाखवून नोंदी करण्याची किंवा नोंद करण्याची मागणी करतात परंतु त्या निकालाच्या विरुद्ध वरिष्ठ कोर्टामध्ये अपील झालेली असते त्यामध्ये स्टे असू शकतो किंवा आपल्याला निकाल ही विरुद्ध पार्टीच्या बाजूने झालेला असू शकतो हे सर्व उताऱ्यावर नाव असलेल्या व्यक्तीला नोटीस बजावल्यानंतर कळते त्यामुळे एकदा उताऱ्यावर नाव आल्यामुळे ते नाव कमी करण्यासाठी व कमी करण्यापूर्वी संबंधित धारकाला नोटीस बजावणी त्यांचे म्हणणे घेणे व त्यानंतरच त्यांचे नाव कमी करणे आवश्यक आहे.
0 Comments