तुळजापूर :प्राचार्य डॉ. आप्पाराव हिंगमिरे यांना महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार जाहीर
----------------------------------------------------------------------------
चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील सुपुत्र प्राचार्य डॉ. आप्पाराव वासुदेव हिंगमिरे यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल, महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार -२०२५ जाहीर झाला आहे.श्री. हिंगमिरे हे सध्या जिजाऊ अध्यापक विद्यालय बाचोटी तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे प्राचार्य या पदावर कार्यरत आहेत. त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
0 Comments