पेंटर हरिष पाटील यांचे शिवरायांच्या राज्याभिषेक पेटिंगचे प्रकाशन

Hot Posts

6/recent/ticker-posts

पेंटर हरिष पाटील यांचे शिवरायांच्या राज्याभिषेक पेटिंगचे प्रकाशन

पेंटर हरिष पाटील यांचे शिवरायांच्या राज्याभिषेक पेटिंगचे प्रकाशन

धाराशिव : यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे..आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी आपल्या छत्रपतींचा इतिहास माहिती पाहिजे.आणि हाच इतिहास प्रत्येकाच्या मनात टिकून राहावा म्हणून, प्रसिद्ध चित्रकार श्रीयुत हरीश पाटील गेले एक वर्ष एका प्रकल्पावर अथक मेहनत करत होते ते म्हणजे राज्याभिषेक सोहळ्याचे पेंटिंग! गेले चार महिने सतत दिवस रात्र काम केल्यानंतर, ते पेंटिंग यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.

त्यांच्या या मनोभावे केलेल्या कार्याची दखल घेण्यासाठी आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब  त्याच बरोबर अनेक मान्यवर सुद्धा तिथे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, माननीय मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माननीय जयकुमार रावलजी , आमदार माननीय मनीषाताई चौधरी यांचीही उपस्थिती होती.तसेच हे पेंटिंग त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना भेट म्हणून प्रदान केले.

Post a Comment

0 Comments