चिवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार

Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार

चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोमवारी दि, १७ रोजी पार पडला. यावेळी बालकलाकारांनी विविध हिंदी , मराठी, गीतांसह देशभक्तीपर गीतावर आपल्यातील कलागुणांचा अविष्कार सादर करत उपस्थितांची दाद मिळवली

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच शिवकन्या प्रशांत बिराजदार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश जाधव, माजी सरपंच बालाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील, सचिन शिंदे शालेय समिती उपाध्यक्ष प्रतिभा साखरे विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बालाजी शिंदे, व्हॉइस चेअरमन मोतीराम चिमणे, नेताजी शिंदे, शत्रुघन बिराजदार, दत्तात्रय घोडके, सुभाष चिमणे, पांडुरंग गायकवाड, गणेश बायस, अनंत हके केंद्रप्रमुख येवती यांच्या हस्ते करण्यात आले. वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सव इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यात चिमुकल्याने,  आमचे दैवत छत्रपती, चला जेजुरीला जाऊ, माऊली माऊली रूप तुझे,या प्रकारची एकापेक्षा एक सरस चित्रपट गीते कोळगीते व देशभक्तीपर गीते सादर करून धमाल उडवून दिली. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षक,अण्णासाहेब भोंग,सहशिक्षक  म्हेत्रे सर, मोहन राजगुरू , सहशिक्षक शरद सोनटक्के, मुख्याध्यापक विवेक  नवले, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी अनुष्का मनशेट्टी आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी पालक ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments