Hot Posts

6/recent/ticker-posts

घर जागा आपल्या मालकीची असताना आपल्या परस्पर दुसऱ्या व्यक्तीने त्या घरावर ग्रामपंचायत किंवा नगरपरिषदेला नाव लावलेली असेल तर काय करावे लागेल ?

घर जागा आपल्या मालकीची असताना आपल्या परस्पर दुसऱ्या व्यक्तीने त्या घरावर ग्रामपंचायत किंवा नगरपरिषदेला नाव लावलेली असेल तर काय करावे लागेल ?

जर एखादी घर जागा आपल्याला खरेदीखताप्रमाणे वारस हक्काने किंवा अन्य कोणत्याही कायदेशीर मार्गाने मिळालेली असेल व त्या घर जागेवर आपण आपले नाव लावलेले असेल परंतु आपल्या परस्पर आपल्या संमतीविना व आपण कोणत्याही रजिस्टर दस्त लिहून दिलेला नसतानाही दुसऱ्या व्यक्तीने त्या घराला त्यांचे नाव लावलेले असेल तर त्या दुसऱ्या व्यक्तीला त्या घराची कायदेशीर मालकी मिळत नाही आपले नाव कमी होऊन त्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव लागलेले असेल तर आपले नाव कमी कसे झाले याबाबतची कागदपत्रे काढून पाहावे ते बेकायदेशीर पद्धतीने कमी झालेली असेल तर आपण दिवाणी न्यायालयामध्ये मालकी ठरवून मिळण्याचा दावा दाखल करू शकतो त्या घरावर आपला कब्जा असेल तर ज्याने खोटे नाव लावलेले आहे त्यांच्याविरुद्ध मनाई अर्ज दाखल करू शकतो दावा दाखल करू शकतो आणि जर त्या दुसऱ्या व्यक्तीने स्वतःचे बेकायदेशीर नाव लावून कब्जाही घेतलेला असेल तर आपली मालकी दिवाणी न्यायालयामध्ये ठरवून मागण्याचा व कब्जा मिळण्याचा अशा प्रकारचा दावा सुद्धा दाखल करू शकतो.

Post a Comment

0 Comments