हिंदू पुरुषाने धर्मांतर केल्यामुळे त्या पुरुषाला दुसरी लग्न करण्याची परवानगी मिळते का ?
एखाद्या हिंदू पुरुषांची पहिले लग्न झालेले असेल व ते लग्न अस्तित्वात असेल म्हणजेच त्या पहिल्या पत्नीपासून कायदेशीर घटस्फोट घेतलेला नसेल आणि ज्या त्या हिंदुपुरुषाने हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये धर्मांतर केले व त्या दुसऱ्या धर्मातील महिलेची विवाह जरी केला तरीही पहिले लग्न रद्द होत नाही पहिले लग्न हे काय घटस्फोट होईपर्यंत किंवा ते लग्न मान्य न्यायालयाने रद्द ठरवून पर्यंत अस्तित्वात राहते केवळ धर्मांतर केले म्हणून दुसरे लग्न करण्याचे अधिकार प्राप्त होऊ शकत नाहीत असा महत्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने सरला मृदल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या केस मध्ये 1995 स*** दिलेला आहे तो न्याय निर्णय 1995 तीन सुप्रीम कोर्ट केसेस पान नंबर 635 यावर रिपोर्ट झालेला आहे.
0 Comments