Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथे शटर उचकटून दीड लाखाचे साहित्य लंपास,

तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथे शटर उचकटून दीड लाखाचे साहित्य लंपास,


धाराशिव : दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने आत मध्ये प्रवेश करत लॅपटॉप एनर्जी ड्रिंक चे बॉक्स असा एकूण 80 हजार रुपयांचा माल चोरून नेला ही घटना तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथे दिनांक 16 ते 17 फेब्रुवारी दरम्यान घडली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरळी बुद्रुक येथील प्रकाश वसंत पोळ यांच्या न्यू श्रीफळ एजन्सी दुकानाचे शटर अज्ञात व्यक्तीने उचकटून आत प्रवेश करत एचपी कंपनीचा लॅपटॉप रेड बुल एनर्जी ड्रिंक चे आठ बॉक्स मॉन्स्टर एनर्जी नऊ बॉक्स व रोख रक्कम 80000 असा एकूण 1 लाख 51 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments