बीड जिल्ह्यात मागील पाच वर्षात 276 खून, 766 खुनाचा प्रयत्न करण्याची गुन्हे दाखल
बीड : बीड जिल्ह्यात मागील पाच वर्षात 276 खून झाले आहेत तर 766 खुणाचा प्रयत्न करण्याची गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 या दहा महिन्यांचा कालावधीत 36 खून झाल्याची माहिती राज्याच्या गृह विभागाने तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे गुन्हे दाखल असलेल्या 260 जणांना शस्त्र परवाने देण्यात आले होते; त्यातील 199 परवान धारकांची शस्त्र परवाने निलंबित तसेच रद्द करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
राष्ट्रवादीचे आ.रोहित पवार यांनी या संदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले आहे गृह विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार बीड जिल्ह्यात मागील पाच वर्षात 276 खून झाले आहेत; तसेच 766 कोणाचा प्रयत्न करण्याचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत जानेवारी 24 ते ऑक्टोबर 2024 या 10 महिन्याच्या कालावधीत 36 खुणांच्या घटना नोंदवण्यात आली आहेत. गुन्हे नोंद असलेल्या 260 जणांना शस्त्र प्रमाणे देण्यात आले होते त्या संदर्भात तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याकडे सुनावणी घेऊन गुन्हे नोंद असलेल्या परवानाधारक तसेच परवानाधारक अशा एकूण 199 परवानाधारकांच्या शस्त्राचा परवाना रद्द केला आहे. व निलंबित केला आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लेखी उत्तरात दिली आहे.
0 Comments