Hot Posts

6/recent/ticker-posts

बार्शी: प्रियकरांनी विवाहातीची स्कार्पने गळा आवळून केली हत्या

प्रियकरांनी विवाहातीची स्कार्पने गळा आवळून केली हत्या, तीन महिन्याच्या तपासानंतर गुन्हा उलगडला आरोपी अटकेत अनैतिक संबंधाचा शेवट


सोलापूर : बार्शी शहराच्या अलीपुर रोड परिसरात ज्वारीच्या शेतात एका महिलेचा असलेल्या अवस्थेतील मृतदेह तीन महिन्यापूर्वी आढळून आला होता मृतदेहावरून अपघात पताचा संशय होता तपासा दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी नितीन प्रभू जाधव वय 35 राहणार घाटंग्री धाराशिव याला ताब्यात घेतली असून अनैतिक संबंधातून झालेल्या वादामुळे त्याने अर्चना विनोद शिंदे वय (32) राहणार घाटंग्री ता. जिल्हा धाराशिव हिचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की 26 जानेवारी रोजी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास शेतमालक प्रवीण गव्हाणे हे आपल्या अलिपुर रोड बार्शी येथील शेतात गेली असता त्यांना तेथे दुर्गंधी येत असल्याने पाहिले असता महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात याची खबर दिली पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले यावेळी अंदाजे 30 ते 35 वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह आढळला तिच्या चेहऱ्यावर मांस नव्हते उजवा पाय गोट्यापासून गायब होता दोन्ही हात खांद्यापासून तोडलेली होती आणि संपूर्ण शरीर कुजलेल्या अवस्थेत होते त्यामुळे ओळख पटवणे अवघड झाले होते पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे पाठवला घटनास्थळी तपास केली असता एक एक गुलाबी स्कार्प चॉकलेटी रंगाच्या चपला पैंजण जोडवे बांगड्या आधी पुरावे गोळा केले होते

मृत महिलेची ओळख आणि आरोपीचा शोध

तपासादरम्यान पोलिसांनी बार्शी आणि सोलापूर ग्रामीण परिसरातील मिसिंग व्यक्तीची माहिती घेतल तसेच सोशल मीडियाद्वारे मृत महिलेबाबत माहिती प्रसिद्धी केली. ८ मार्च रोजी पोलिसांना अलीपुर रोडवरील धनाजी लोंगसे यांनी माहिती दिली की धाराशिव जिल्ह्यातील अर्चना शिंदे आणि नितीन जाधव हे त्यांच्या घरी भाड्याने राहिला होते दिनांक 10 जानेवारी रोजी संध्याकाळी चार वाजता ते अलिपुर गावच्या दिशेने गेले आणि परतले नाहीत त्यांच्या घरमालकाने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अर्चना शिंदे यांच्या कपड्याची ओळख पटवली यानंतर नितीन जाधव यांच्या मोबाईलवर संपर्क साधून अर्चना विषयी विचारले असता त्यांनी अर्चना हीच ओळख नसल्याचे सांगून उडवा उडवी चे उत्तर दिले मात्र पोलीस आणि नितीन जाधव व अर्चना शिंदे यांच्या दोघातील मोबाईलची सीडीआर तपासले असतात दोघांना अनेक वेळा कॉल झाल्याचे दिसून आले. यामुळे नितीन विषयांकीन संशय बळावला यानंतर पोलिसांनी अर्चना शिंदे यांच्या आधार कार्ड वरील पत्ता शोधले असता ती धाराशिव जिल्ह्यातील घाटंग्री गावातील असल्याचे समजले अधिक माहिती घेतली असता तिचा पती विनोद शिंदे यांनी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात पत्नी अर्चना शिंदे हिची मिसिंग तक्रार दिली होती पोलिसांनी नितीन जाधव यांचा मोबाईल नंबर ट्रॅक केला असता ते धाराशिव हातलाई परिसरात असल्याची आढळले दिनांक 9 मार्च रोजी बार्शी पोलीस आहे दाराची येथे जाऊन त्याला ताब्यात घेतली.

अटक आणि कबुली जबाब

तपासा दरम्यान अर्चना शिंदे व नितीन जाधव हे दोघे एकाच गावातील रहिवासी नितीन हा त्याच्या गाडीतून शेतकऱ्यांना लेबर पुरवण्याचे काम करत होता तर अर्चना शिंदे ही देखील लेबर म्हणून नितीन च्या गाडीत जात होती. दोघांत ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले अर्चनाच्या मृत्यूपूर्वी पाच सहा महिन्यापासून दोघात अनैतीक प्रेम संबंध जडले होते. अर्चना चा नवरा दारू व्यसनी होता तर नितीनचीही लग्न झाले व त्याला मुले झालेल्या आणि ती प्रेम संबंधाची माहिती घरी व गावात कळेल बदनामी होईल अशी नितीन ला वाटायचे यामुळे नितीन अर्चना दोघांनी बार्शी ते राहण्याचा निर्णय घेतला अलीपूर रोड येथे रूम किरायाने घेऊन दोघे राहू लागले दोन-तीन दिवसाढ नितीन हा बार्शी येथे अर्चना कडे राहण्यासाठी येत असेल तसेच नीतीनला बार्शीत येण्यासाठी अर्चना ही भाग पडत असेल पंधरा दिवस बार्शी येथे राहिल्यानंतर अर्चना ही वारंवार म्हणायची मी माझ्या घरी जाणार नाही तू मला तुझ्या घर घेऊन चल व तू तुझ्या घरी मला नाही घेऊन गेलास तर तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून मी मरणार अशी धमकी द्यायची परंतु गावात बदनामी होईल व कौटुंबिक अडचणी येतील अशी नितीन अर्चनाला सांगायचा परंतु अडचण ऐकण्याचा मनस्थितीत नसायची याच कारणांन दिनांक 10 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अर्चना व नितीन या दोघांचे भांडण झाले त्यावेळी नितीन यांनी अर्चना हिला मारून टाकायचा विचार केला तिला गोड बोलून अलीपूर रोड बार्शी येथील ज्वारीच्या शेतात नेऊन अर्चना हिचा तिच्यास कार्पणी गळा वळून मारून टाकले व तिचा मोबाईल फोडून दिला व नितीन हा त्याच्या गावी निघून गेला अशी कबुली नितीन जाधव या संशयित आरोपीने दिली असल्याची माहिती पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments