Hot Posts

6/recent/ticker-posts

लोहारा : लाचखोर कंत्राटी पॅरामेडिकल वर्कर १५ हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात-Acb trap in paramedical worker

लोहारा : लाचखोर कंत्राटी पॅरामेडिकल वर्कर १५ हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात-


धाराशिव : कुष्ठरोग विभागात कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या पॅरामेडिकल वर्करचा दोन महिन्याचा पगार व मागील प्रवास भत्ता काढून देण्यासाठी 27 हजार रुपयाची लाच दुसऱ्या पॅरामेडिकल वरकरणी घेतली होते. रंगेहाथ  पकडल्यानंतर बुधवारी न्यायालयाने 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत एसीबी कडून मिळालेली अधिक माहिती अशी की लोहारा येथे कुष्ठरोग विभागात कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या तक्रारदाराचे जानेवारी व फेब्रुवारी महिन्याची वेतन अदा झाली नव्हती शिवाय मागील वर्षातील प्रवास भत्ता ही थकलेला होता हे वेतन व भत्ते डॉक्टर कोरे व सांख्यिकी सहाय्यक माळी यांना सांगून काढून देण्यासाठी धाराशिव येथे कार्यरत कंत्राटी पॅरामेडिकल वर्कर नर्सिंग तुकाराम सूर्यवंशी यांनी 27 हजार रुपये लाचीची मागणी केला. या प्रकाराची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिल्यानंतर उपअधीक्षक सिद्धाराम मैत्री यांनी पंचा समक्ष लाच मागणीची पडताळणी करून घेतली यानंतर पोलीस निरीक्षक विकास राठोड कर्मचारी नेताजी अनपट सचिन शेवाळे विकास डोके नागेश शेरकर शशिकांत हजारे प्रकाश भोसले दत्तात्रय करडे यांच्या माध्यमातून बुधवारी सायंकाळी सेंट्रल बिल्डिंग येथे सापळा रचला यावेळी आरोपी सूर्यवंशी हा पहिला हप्ता म्हणून पंधरा हजार रुपये लाच घेताना रंगेहात सापडला. याप्रकरणी आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून बुधवारी आरोपी न्यायालयासमोर हजर केले असता 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी  दिली आहे.

Post a Comment

0 Comments