एटीएम मधून पैसे काढणे 1 मे पासून महागणार पूर्वी 17 रुपये होते आता प्रति व्यवहार 19 रुपये लागतील रिझर्व बँकेची शुल्क वाढीला मंजुरी
नवी दिल्ली : येत्या 1 मे पासून देशात एटीएम (Atm)मधून पैसे काढणे महाग होणार आहे कारण रिझर्व बँकेने एटीएम इंटरचेंज शुल्कात वाढ करण्यास मान्यता दिली आहे याचा अर्थ असा की आता जे ग्राहक त्यांच्या आर्थिक व्यवहारासाठी एटीएमचा जास्त वापर करतात त्यांना एका विशिष्ट मर्यादीनंतर एटीएम मधून पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. एटीएम सेवा पुरवण्यासाठी एका बँकेकडून दुसऱ्या बँकेला एटीएम इंटरचेंज फी दिली जाते हे शुल्क प्रत्येक व्यवहारासाठी एक निश्चित रक्कम आहे आणि ते ग्राहकांना बँकिंग खर्च म्हणून आकारले जाते.
आता हे शुल्क वाढल्याने त्याचा भार बँक ग्राहकावर येणार आहे रिझर्व बँकेने व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सनी (white lable atm opeters)केलेल्या विनंती नंतर हे शुल्क सुधारण्याचा निर्णय घेतला वाढत्या कामकाज खर्चाचे व्यवसायावर परिणाम होत असल्याचे white लेबल एटीएम ऑपरेटर्सने म्हटले होते शुल्क वाडीची देशभरात अंमलबजावणी होणार असून त्याचा परिणाम ग्राहकावर विशेषतः लहान बँकांच्या ग्राहकावर होण्याची अपेक्षा आहेत या बँका एटीएम पायाभूत सुविधा आणि संबंधित सेवासाठी मोठ्या वित्तीय संस्थांवर अवलंबून आहेत. ज्यामुळे त्यांना वाढत्या खर्चाची सामना करावा लागतो.
एकेकाळी एटीएम ही एक क्रांतिकारी बँकेची सेवा म्हणून पाहिली जात होती तथापि आता भारतात डिजिटल पेमेंटच्या वाढीमुळे ते संघर्ष करीत आहेत ऑनलाईन वॉलेट आणि यूपीआय व्यवहाराच्या सोयीमुळे रोख रक्कम काढण्याची गरज बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे सरकारी आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2014 मध्ये भारतात डिजिटल पेमेंट चे मूल्य 952 लाख कोटी रुपये होते आर्थिक वर्ष 2023 पर्यंत आकडा 3658 लाख कोटी रुपयावर गेला हा कॅशलेस व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्याने असलेल्या बदलाचे प्रतिबंध आहे या नवीन शुल्क वाढीमुळे जे ग्राहक अजूनही रोग व्यवहारावर अवलंबून आहेत त्यांना बोजा जाणवू शकतो.
रिझर्व बँकेची शुल्क वाढीला मंजुरी इतके पैसे मोजावे लागणार -Reserve Bank Atm Fees
1 मे पासून ग्राहकांना एटीएम मधून मोफत मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारासाठी दोन रुपये जास्त मोजावे लागतील एटीएम मधून पैसे काढण्यासाठी प्रति व्यवहार 19 रुपये लागतील जे पूर्वी 17 रुपये होते याशिवाय जर ग्राहक पैसे काढण्या व्यतिरिक्त इतर कारणासाठी एटीएम चा वापर करत असतील जशी की बॅलन्स चौकशी तर त्याला एक रुपया अतिरिक्त द्यावे लागतील खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी आता प्रति व्यवहार सात रुपये लागतील जे सध्या सहा रुपये आहे असे अधिकृत अधिसूचनेमध्ये म्हटले आहे.
0 Comments