तीन गुंठ्यात शेतकऱ्याने पिकविला ४ कोटींचा अफू, ५४० किलो ७५९ ग्रॅम अफूचे पीक पोलिसांनी केली जप्त
बीड : धारूर तालुक्यातील पिंपरवाडा येथील शेत गट नंबर 33 मध्ये रामहरी कारभारी तिडके या शेतकऱ्याने तीन गुंठे क्षेत्रावर शेततळ्याच्या माध्यमातून पाणी संकलित करत ४ कोटी रुपयांची अफूची शेती पिकविलाचे पोलीस कारवाईत उघड झाले आहे. अटक केलेल्या शेतकऱ्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शेतात अफू लागवडी बाबत माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा पथक व धारूर पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली. शेतात अमली पदार्थांच्या झाडांची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे दिसून आले यावेळी अमली पदार्थ अफूची पांढरीशुभ्र फुले व त्यास गोलाकार बोंड असलेली हिरवी व पिवळसर पाणी असलेली झाडे मुळासह 42 गोण्या जप्त करण्यात आल्या पोलिसांनी केलेल्या वजनानुसार 540 किलो 759 ग्रॅम अपोजप्त केला बाजार मूल्यानुसार 80 हजार रुपये प्रति किलो प्रमाणे जप्त अफूची किंमत ४ कोटी ३२ लाख 60 हजार 720 रुपये आहे रामहरी तिडके यांच्याविरुद्ध धारूर पोलीस ठेवण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोरोगीय व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमन 1985 चे कलम 8(बी) 15 18 प्रमाणे गुन्हा दाखल करून करण्यात आला आहे.
आरोपीला २ मार्च रोजी धारूर न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधीक्षक नवनीत पावत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर अंबाजोगाई च्या पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उस्मान शेख जोनवाल उपनिरीक्षक महेश विघ्ने, ग्रेड उपनिरीक्षक हनुमान खेडकर पोलीस हेड कॉन्स्टेबल तुषार गायकवाड ,महेश जोगदंड भागवत शेलार ,पोलीस अंमलदार बाबासाहेब घोडके, एसआय संजय जायभाये तसेच धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे एएसआय भुसारी व कर्मचाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली.
0 Comments