धाराशिव जिल्ह्यात लाळ खुरकूत लसीकरण मोहीम सुरू
धाराशिव : जिल्ह्यात जनावरांच्या लाळ खुरकूत रोगावरील लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. एकूण 45 दिवस ही मोहीम राबविण्यात येत आहे यासाठी पाच लाख 50 हजार 500 लस्सींची उपलब्धता झाली आहे प्रशासनांना पशुपालकांना त्यांच्या पशुधनाच्या वेळेत लसीकरण करून घेण्याची आवाहन केले आहे.लाळ खुरकूत हा विषाणूजन्य रोग असून संसर्ग झाल्यास पशुधनाला 105 ते 106 डिग्री ताप तोंड व खोरांमध्ये जखमा होतात यामुळे जनावरे खाणे पिणे बंद करतात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते दुग्ध उत्पादनात घट होते गर्भवती गाई म्हशी व शेळ्यांमध्ये गर्भपाताची शक्यता असते हा रोग हवेद्वारे वेगाने पसरतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक लसीकरण हाच एकमेव प्रभावी उपाय आहे ही राष्ट्रीय स्तरावरील लसीकरण मोहीम 15 फेब्रुवारी ते 31 मार्च पर्यंत राबवल्या जात आहे आतापर्यंत जिल्ह्यातील 39 हजार पशुधनाची लसीकरण पूर्ण झाले आहे उर्वरित पशुपालकांनी तातडीने लसीकरण करून घेण्याची आव्हान जिल्हा प्रशासनाने केली आह जिल्ह्यातील एकही पशुधन लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने पशुधन विकास अधिकारी सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांनी पशुधन पर्यवेक्षकांना सक्त सूचना दिले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी दिली.
0 Comments