Hot Posts

6/recent/ticker-posts

परभणी : अकॅडमी चालकांनी नोकरीचे आमिष दाखवून तलाठी पदासाठी १६ लाखांची फसवणूक आरोपींच्या शोधासठी पोलीस पथक रवाना

परभणी : अकॅडमी चालकांनी नोकरीचे आमिष दाखवून तलाठी पदासाठी १६ लाखांची फसवणूक आरोपींच्या शोधासठी पोलीस पथक रवाना


हिंगोली : परभणी जिल्ह्यातील एका तलाठी पदावर नियुक्ती करून देतो म्हणून दोघांनी 16 लाख 2 हजार रुपये घेत बनावट स्वाक्षरीची ऑर्डर व्हाट्सअप वर टाकून फसवणूक केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणातील आरोपींच्या शोधात पोलीस पथक रवाना झाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सतीश आप्पाराव राक्षसे राहणार एरंडेश्वर तालुका पूर्णा जिल्हा परभणी हे वसमत शहरातील बहिर्जी नगर येथे कमांडो करिअर अकॅडमी चालवतात त्यांना जितेंद्र मच्छिंद्र कांबळे राहणार लिंबाळा तालुका औसा जिल्हा लातूर , नदी चंद्रमणी दिबाकर राहणार (पिंपळे सौदागर पिंपळे गुरव पुणे) यांनी तुमचे नाव तलाठी पदाच्या यादीत नंतर तलाठी पदावर भरती करून ऑर्डर देतो असे सांगितले त्यासाठी या दोघांनी 16 नोव्हेंबर 2023 ते 20 मार्च दरम्यान ऑनलाईन 16 लाख 2 हजार रुपये घेत सतीश राक्षसे यांच्या व्हाट्सअप वर तलाठी पदाची बनावट स्वाक्षरी ची यादी पाठवत फसवणूक केली राक्षसे  यांनी या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती त्यानुसार चौकशी आणि 20 मार्च रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणातील आरोपींच्या शोधात शहर पोलीस ठाण्याचे पथक पुण्याकडे निघाले आहे.

Post a Comment

0 Comments